करीनाचा, पती सैफ अली खानसोब...

करीनाचा, पती सैफ अली खानसोबतचा बर्थडे सेल्फी इंटरनेटवर आग लावत आहे, कंगना, करण सह इतर सेलेब्सने देखील तिला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा! (Kareena Kapoor’s Stunning Birthday Post With Husband Saif Ali Khan Sets Internet On Fire, Kangana Ranaut, Karan Johar And Among Celebs wish Her)

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आज तिचा ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या वाढदिवशी तिने सैफ अली खानसोबतची सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सिनेमांसोबतच करीना तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली. सैफ अली खानसोबत लग्न असो किंवा मुलांची नावं करीनाच्या चर्चा कायमच रंगल्या. बॉलिवूडमधील कंगना रणै्ात, करन जौहर, करिश्मा कूपर आणि मलायका अरोरा यांनी लाडक्या बेबोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Kareena Kapoor, Birthday

करीना कपूर जितकी सुंदर आहे, तितकीच तिची बर्थडे पोस्टही सुंदर आहे. हल्लीच करीना आणि  सैफ आपल्या दोन्ही मुलांसोबत मालदीवला सुट्टी घालविण्याकरिता जाऊन आली. त्यांचे मालदीव येथील आकर्षक फोटो सोशल मीडियावर बऱेच व्हायरल झाले आणि आज सकाळी करीनाने सैफ सोबतचा सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये उभयता छान दिसत आहेत. करीनाच्या चेहऱ्यावरील तेजामुळे तिचं सौंदर्य अजून खुललं आहे.

Kareena Kapoor, Birthday

करीना कपूर खानने तिचा वाढदिवस रोमँटिक डिनरसह साजरा केला. सोमवारी संध्याकाळी, अभिनेत्रीने या रोमँटिक डिनर डेटची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आणि ““उफ़्फ़ क्या रात आई है!” अशी मजेदार कॅप्शन लिहिली आहे. बहीण करिश्मा कपूरच्या ब्लॉकबस्टर चित्रपट “राजा हिंदुस्तानी” च्या लोकप्रिय गाण्याची ही ओळ आहे.

आज ४१ वर्षांची झालेल्या करीनाला चित्रसृष्टीतील तिच्या सहकलाकारांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Kareena Kapoor, Birthday

मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवर करीनाचा एक फोटो शेयर करुन लिहिलंय, “माझ्या सर्वात रुबाबदार आणि सुंदर बेबोला जन्मदिवसाच्या शुभेच्छा. तू नेहमी अशीच तेजोमय राहा.”

Kareena Kapoor, Birthday

बॉलिवूडचे चित्रपट निर्माते करण जौहरने देखील सोशल मीडियावर करीनासोबतचा एक जुना सेल्फी शेअर केला आहे. त्यात त्याने करीनाची पाठ थोपटत माझ्या फेव्हरेट गर्लला तिच्या खास दिनी खूप प्रेम. माझ्या पूला आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा असे म्हटलं आहे.

Kareena Kapoor, Birthday

रकुल प्रीत सिंगनेही करीनाला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Kareena Kapoor, Birthday

विवेक ओबेरॉयने वाढदिवसाच्या निमित्ताने सुंदर बेबोला शुभेच्छा दिल्या.

Kareena Kapoor, Birthday

पुनीत मल्होत्रानेही करीनाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Kareena Kapoor, Birthday

रिद्धिमा कपूर साहनीनेही करीनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.