करिश्माच्या वाढदिवसानिमित्त करिनाची खास पोस्ट&#...

करिश्माच्या वाढदिवसानिमित्त करिनाची खास पोस्ट…तू आपल्या कुटुंबाचा अभिमान आहेस (Kareena Kapoor wishes Karishma on birthday with adorable post, calls her ‘pride of our family’)

अभिनेत्री करिश्मा कपूर आज २५ जूनला तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. करिश्माच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड सेलिब्रेटींसह तिचे चाहते सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. तर बहीण करीना कपूरने सुद्धा सोशल मीडियावर तिच्यासाठी खास अंदाजात शुभेच्छा देत करिश्माला कुटुंबाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रात्री १२ वाजता करिश्माचा लहानपणीचा एक खूप गोड फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये ‘’तू कुटुंबाचा अभिमान आहेस….. तुझा हा फोटो मला सगळ्यात जास्त आवडतो. आज सगळ्यांनी बोला, हॅप्पी बर्थडे टू अवर लोलो.” त्यापुढे करीनाने खूप सारे हार्ट इमोजी दिले आहेत.

करीना सध्या तिच्या कुटुंबासोबत लंडनला सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. करीनाच्या या पोस्टवर रणवीर सिंह, नेहा धुपिया, अमृता अरोरा, सोहा अली खान यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनीसोबत तिच्या चाहत्यांनी करिश्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या व्यतिरिक्त करिश्माची खास मैत्रीण मलाइका अरोराने देखील करिश्मासोबतचा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरिसला गेली आहे.

करीना आणि करिश्मा बॉलिवूडच्या सगळ्यात सुप्रसिद्ध बहिणी आहेत. दोघी बरेचदा एकमेकींसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.