सीतेच्या भूमिकेसाठी १२ करोड मागणाऱ्या करीनाने, ...

सीतेच्या भूमिकेसाठी १२ करोड मागणाऱ्या करीनाने, त्याबाबत पहिल्यांदाच केला खुलासा (Kareena Kapoor Was Trolled For Demanding 12 Crores For Sita’s Role, Now Breaks Silence For The First Time; Said This Thing)

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक हुशार आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये करीना कपूरची वर्णी लागते. करीना आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही आयुष्यात तिची जबाबदारी जाणून वागताना दिसते. मागील काही दिवस सीतेच्या भूमिकेवरून तिला बरेच ट्रोल केले गेले.

सीतेची भूमिका करण्यासाठी करीनाने निर्मात्याकडून तब्बल १२ करोडची मागणी केली होती. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि लोकांनी तिला एवढी मोठी रक्कम मागितली म्हणून चांगलंच ट्रोल केलं होतं. असं असताना आता पहिल्यांदाच करीनाने या प्रकरणाबाबतचा खुलासा केला आहे.

Kareena Kapoor, Trolled, Sita’s Role

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सीतेच्या भूमिकेसाठी आपण १२ करोड इतकं मोठं मानधन मागण्यामागचे कारण सांगताना करीनानं म्हटलं आहे, “काही वर्षांपूर्वीपर्यंत पुरुष आणि महिलांना चित्रपटासाठी एकसमान वेतन मिळण्याबाबत कोणी बोलत नव्हतं. पण आता आमच्यापैकी अनेक लोक याबाबत मोकळेपणाने बोलत आहेत.” करीनाने पुढे म्हटलंय, ‘मला काय हवं ते मी सांगू इच्छिते आणि मला असं वाटतंय की महिलांना देखील पुरुषांइतकाच सन्मान दिला गेला पाहिजे.’

Kareena Kapoor, Trolled, Sita’s Role

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

करीनाने पुढे असंही म्हटलंय की, “गोष्ट माझ्या मागण्यांची नाहीये. तर महिलांच्या सन्मानाची आहे अन्‌ आता परिस्थिती बदललीच पाहिजे, असं मला वाटतं.”

Kareena Kapoor, Trolled, Sita’s Role

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मिळालेल्या माहितीनुसार ‘सीता’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी अलौकिक देसाईला सोपवण्यात आली होती, या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीस ८-१० महिने ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता होती. अशातच करीना खानची या भूमिकेसाठीची मानधनाची मागणी ऐकल्यानंतर लोकांनी तिला चांगलेच ट्रोल केले होते. तुमचं यावर काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा.