‘लाल सिंह चड्ढा’चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फि...

‘लाल सिंह चड्ढा’चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यावर करीनाने चाहत्यांना घातली साद, म्हणाली प्लिज चित्रपटाला बॉयकॉट करु नका, तो पहा (Kareena Kapoor Takes U-turn After Laal Singh Chaddha Fails At Box Office, Says- Please Don’t Boycott The Film, Go And Watch Us In Theatres)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर होता. तरीही चित्रपटाच्या टीमने जोरदार प्रमोशन करत प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो प्रयत्न असफल ठरल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. सोशल मीडियावर अजूनही या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे.

सोशल मीडियावर चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी लक्षात घेता. आमिर खानने प्रमोशनमध्ये प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अभिनेत्री करीना कपूर खानने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. तसेच तिने बॉयकॉटची मागणी करणाऱ्या लोकांना तसे करु नका असे म्हटले आहे. तसेच तिने मागे जे काही म्हटले होते त्यामागचे स्पष्टीकरण दिले आहे.

करीनाने म्हटले की, केवळ एक टक्का लोकच चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत. मात्र इतर लोकांकडून चित्रपटाला प्रेमच मिळत आहे. पण बॉयकटची मागणी करणाऱ्यांनी तसे करु नये. हा खूप छान चित्रपट आहे. लोकांनी मला आणि आमिरला पडद्यावर पाहावे अशी माझी इच्छा आहे. आम्ही या चित्रपटाची ३ वर्षे वाट पाहिली आहे. त्यामुळे कृपया हा चित्रपट बॉयकॉट करु नका. चित्रपटाच्या क्रूने खूप मेहनत घेतली आहे. २५० लोक दीड वर्ष या चित्रपटासाठी काम करत होते.

यापूर्वीही आमिरने आपण खूप नर्व्हस असल्याचे सांगत लोकांना हा चित्रपट पाहण्याची विनंती केली होती. तेव्हा मात्र करीना म्हणाली होती की, ती या गोष्टी गांभीर्याने घेत नाही आणि अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. आपल्याकडे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. त्यामुळे आता असे होत असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. अन्यथा आपले जीवन जगणे कठीण होईल. हे सर्व मी गांभीर्याने न घेण्याचे कारण आहे.

एखादा चित्रपट चांगला असेल तर त्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि तो इतर कोणत्याही गोष्टीला मागे टाकेल. करीनाच्या या वक्तव्यावर ट्रोलर्सही नाराज झाले होते. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाची ओपनिंग खूपच निराशाजनक झाली आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षकच नसल्यामुळे शो देखील रद्द करावे लागले आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या  अपयशाचे कारण हे बॉयकॉट ट्रेण्ड असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच करीनाने सुद्धा पलटी मारली आहे.