विंचेस्टरच्या बोर्डिंग स्कूलमध्ये गेले सैफ, करी...

विंचेस्टरच्या बोर्डिंग स्कूलमध्ये गेले सैफ, करीना आणि तैमूर, गॉडफादरसोबत शेअर केले फोटो (Kareena Kapoor, Taimur Ali Khan accompany Saif Ali Khan to his boarding school in Winchester, share pic with ‘godfather’)

अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर तिचे इंग्लंडमधील फोटो शेअर केले. तेथील काही फोटो हे विंचेस्टर कॉलेजचे आहेत. फोटोत सैफ अली खान , तैमूर आणि एक व्यक्ती विंचेस्टर कॉलेजच्या आवारात फिरताना दिसतात.

अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणीं सोबत लंडनला सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथे ती तिच्या कुटुंबासोबत काही कार्यक्रमांत सहभागी होताना दिसते,  तिच्या मैत्रिणींसोबत लंडनच्या रस्त्यांवर फिरण्याची मजा लुटते, तर कधी मुलांसोबत वेळ घालवते आहे. नुकताच करीनाने लंडनमधील एक फोटो शेअर केला त्यात ती , सैफ , तैमूर आणि तिथले गॉडफादर दिसत आहेत.

करीनाने शेअर केलेल्या फोटोत सैफने बाह्या मुडपलेले शर्ट त्यावर स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातली आहे तर तैमूरने जीन्स आणि हू़डी घातली आहे. करीनाने तिच्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत त्याला  ‘फादर। .. गॉड फादर।।। सन  ❤️विंचेस्टर  2022… ❤️’असे कॅप्शन दिले आहे.

याव्यतिरिक्त करीनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर आणखी काही फोटो शेअर केले ज्यात तिचे काही सेल्फी , आणि तिची बहिण करिश्मा कूपर सोबतचे काही फोटो आहेत. करीनाच्या या फोटोंवर सैफची बहीण सोहा अली खानने ‘माहशाअल्लाह, अमेझिंग!’ अशी कमेंट केली आहे.