कामातून वेळ मिळताच करीना कपूर आपला मुलगा जहांगी...

कामातून वेळ मिळताच करीना कपूर आपला मुलगा जहांगीरसोबत घालवते आहे मजेत वेळ, शेअर केलेल्या फोटोंवर अनुष्का शर्माने दिली अशी प्रतिक्रिया (Kareena Kapoor Spends Quality Time With Jehangir As She Takes A Day Off From Work, Anushka Sharma Reacts, See Pics)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री सोबत तिचा धाकटा मुलगा जहांगीर अली खान दिसत आहे. फोटोत करीना आणि जेहची जोडी हिवाळ्यातील पोशाखांमध्ये छान दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या लंडनमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. करीनासोबत तिचा धाकटा मुलगा जहांगीर अली खान देखील आहे.

कामात वेळ काढून करीना आपल्या मुलाला घेऊन पार्कमध्ये गेली आहे. तिथे ती त्याच्यासोबत मजेत वेळ घालवत आहे. करीनाने शेअर केलेल्या फोटोत जेह आणि ती पार्कमध्ये खुल्या आकाशाखाली मजा करत असल्याचे दिसून येते. या फोटोंवर चाहते लाइक्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.या फोटोंमध्ये करीना कपूरने शर्टवर हाफ स्लीव्ह ब्लॅक जॅकेट घातले आहे. काळ्या सनग्लासेस आणि मॅचिंग हाय बूट्ससह अभिनेत्रीने आपला लूक केला आहे. तर जेहने काळ्या बूटांसह लाल रंगाचे हाफ स्लीव्ह जॅकेटही घातले आहे.

या फोटोंवर करीनाने कॅप्शनमध्ये ‘झाडाचे चुंबन घ्या…आणि मोकळे व्हा… आयुष्यावर प्रेम करा..#कामातून सुट्टी… खूप मज्जा..’ असे लिहिले. अभिनेत्री अनुष्का शर्माने करीना आणि जेहचे कौतुक करण्यासाठी फोटोंवर इमोजी शेअर केली आहे.एक फोटोत जहांगीर झाडासमोर उभा असून करीनाने त्याचा डोक्यावर प्रेमाने हात ठेवत फोटोसाठी पोज दिली आहे. दुसऱ्या फोटोत करीना कुठेतरी पाहत असूनजेह तिला काहीतरी दाखवत आहे.

आई-मुलाच्या या फोटोंवर कमेंट करताना एका चाहत्याने बेबो आणि मिनी बेबो असे म्हटले. तर जेहच्या चाहत्यांनी या फोटोवर लव्ह यू जेह असेही लिहिले आहे, तर कोणी हार्ट इमोजी शेअर केले आहेत.