करीनाने ग्रीसमधील एक जुना फोटो शेअर करत, सैफला ...

करीनाने ग्रीसमधील एक जुना फोटो शेअर करत, सैफला खास अंदाजात दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Kareena Kapoor Shares Unseen Photo with Saif Ali Khan On Wedding Anniversary)

बॉलिवूडचे पॉवर कपल करीना कपूर आणि सैफ अली खान आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे.

हे हॉट कपल बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांच्या परदेश प्रवासादरम्यान ग्रीसला गेलं होतं, जिथे दोघांनी त्यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी लोकांना या दोघांची जोडी खूप आवडली होती.

Kareena Kapoor, Unseen Photo, Wedding Anniversary

हा फोटो शेअर करताना करीनाने कॅप्शन लिहिली आहे, “एकदा ग्रीसमध्ये! सूपचे बाउल आणि आम्ही. आणि याने माझे आयुष्य बदलले. जगातील सर्वात देखण्या माणसाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! ” हा फोटो बघून असे वाटते की, करीना आणि सैफ एका रेस्टॉरंटमध्ये बसले आहेत. करीनाने राखाडी रंगाची शाल परिधान केली आहे. अभिनेत्रीने सैफच्या गळ्यात हात घातले आहेत. या फोटोत सैफ लाल शर्ट घातलेल्या फ्रेंच कट दाढीमध्ये दिसत आहे.

Kareena Kapoor, Unseen Photo, Wedding Anniversary

करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. करीना आणि सैफ अलीने २०१२ मध्ये लग्न केले. सध्या ती दोघं तैमूर आणि जहांगीर  या दोन मुलांचे पालक आहेत. सैफ अली खान आणि करिना कपूर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. चाहते नेहमीच त्यांच्या सुंदर फोटोंची वाट पाहत असतात.

खऱ्या आयुष्याव्यतिरिक्त सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांची जोडी रील लाईफमध्येही अप्रतिम दिसते. या जोडप्यांना करिश्मा कपूरसह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.