सैफच्या वाढदिवसानिमित्त करीनाने शेअर केले अनसीन...

सैफच्या वाढदिवसानिमित्त करीनाने शेअर केले अनसीन फोटो, अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा (Kareena Kapoor shares the unseen pics of hubby Saif on his birthday, Wishes him cutest caption)

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आज 16 ऑगस्टला त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त सैफ अली खानला पत्नी करीना कपूरने खास शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सैफचे काही अनसीन मजेदार फोटो पोस्ट केले आहेत. सोबतच तिने फोटोंना मजेशीर असे कॅप्शनही दिले आहे.

हे फोटो म्हणजे सैफच्या चाहत्यांसाठी एक प्रकारची व्हिज्युअल ट्रीटच आहे. या फोटोतील एका फोटोत सैफ तोंडाचे पाउट करुन पोज देत आहे. तर दुसऱ्या फोटोत तर आश्चर्यचकीत झाल्याची पोज देत आहे.

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये करीनाने लिहिले की, “जगातील सर्वोत्तम माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यामुळे आयुष्याचा प्रवास आणखी मजेशीर झाला आहे. माझ्या आयुष्यात तुझ्यामुळे किती वेडेपणा आला आहे याचे उदाहरण म्हणजे हे फोटो. तू माझ्यासोबत कायम असाच रहा हीच देवाकडे मागणी.मला असे वाटते सैफचे पाउट माझ्यापेक्षा चांगले आहे. तुम्हाला काय वाटते?  बर्थडे बॉय, माझा सैफू.”

सैफचा फोटोतील अंदाज प्रेक्षकांसाठी खूपच नवा असून त्यांना तो खूप आवडत आहे. सैफच्या वाढदिवसानिमित्त करीना त्याच्यासाठी एक स्पेशल प्लॅन केला आहे. अविस्मरणीय बनवण्यासाठी करिनाने काही खास प्लॅन्स केले आहेत. असो, करीना आणि सैफ दोघेही एकमेकांचे खास दिवस अधिक खास बनवण्याची एकही संधी सोडत नाहीत.

सैफ आणि करीना यांची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्तम कपल्समध्ये केली जाते. दोघांनी 16 ऑक्टोबर 2012 ला लग्न केले होते. त्यांना तैमूर आणि जेह ही दोन मुले आहेत.