करीना कपूरने प्रसिद्ध केले तैमूरचे गोड फोटो (Ka...

करीना कपूरने प्रसिद्ध केले तैमूरचे गोड फोटो (Kareena Kapoor shares the cute picture of Taimur Ali Khan)

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

तैमूर अली खानची लोकप्रियता एखाद्या फिल्म स्टारपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर तैमूरचे लाखो चाहते आहेत. करीना कपूरने तैमूरचे कोणतेही फोटो शेअर केल्यानंतर ते लगेचच व्हायरल होतात. यावेळी करीनाने तैमूरचा योगा करतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

या फोटोत तैमूर योगा मॅटवर झोपल्याचं दिसतंय. या फोटोला करीनाने एक मजेशीर कॅप्शन देत लिहिलंय – योगानंतरची स्ट्रेचिंग की झोपेनंतरची स्ट्रेचिंग करतोय… काही कळत नाहीय. एवढंच नाही तर करीनाने या फोटोला लॉकडाऊन योगा असं हॅशटॅग दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी करीना कपूरने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. परंतु दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतरही करीनाचे तैमूरकडेही पूर्ण लक्ष असते आणि तैमूरचे वेगवेगळ्या अंदाजातील गोड फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

करीना तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असली तरी अजूनही तिने तिच्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केलेला नाही, तसेच त्याचं नावंही अजून सांगितलेलं नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांना करीनाच्या दुसऱ्या मुलाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.