जहांगीरच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त करीनाची खास...

जहांगीरच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त करीनाची खास पोस्ट (Kareena Kapoor Shares Heart-Warming Unseen Photos On Son Jeh’s First Birthday)

आज करीना-सैफ अली खान यांच्या दुसऱ्या मुलाचा अर्थात जेह (जहांगीर)चा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने नुकताच करीनाने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिने तिचा मुलगा ‘जेह’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये जेह सोबत तैमूर देखील दिसत आहे. तैमूर आणि जेह बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेले स्टार किड्स आहेत.


करीनाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तैमूर आणि जेह गुडघ्याने चालताना दिसत असून करीनाने या फोटोला छान कॅप्शन दिली आहे. त्यात छोटा जेह, आपल्या पुढे जाणाऱ्या तैमुरला हे सांगत आहे. तो म्हणतोय, ‘भावा, जरा थांब. मी एक वर्षांचा आहे. चल एकत्र जग शोधूया… अर्थात अम्मा  सगळीकडे आपल्या सोबत असणार आहेच… असे म्हणून करीनाने माझा जेह बाबा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’ असं म्हटलं आहे. जेहचा हा पहिला वाढदिवस असल्याने करीना खूप उत्साहात आहे.

जहांगीर अली खान एक वर्षाचा झाल्यानंतर, आता करीना कपूर खान चित्रपटाच्या सेटवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री सुजॉय घोषच्या पुढील क्राईम चित्रपटात काम करणार असल्याचे कळते.
करीना लवकरच आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात झळकणार आहे. ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलीवूड चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.