करीना कपूर आणि सैफ अली यांचा मुलगा तैमूर पाच वर...

करीना कपूर आणि सैफ अली यांचा मुलगा तैमूर पाच वर्षांचा झाला (Kareena Kapoor-Saif Ali Khan’s son Taimur Ali Khan Turns 5th Years Old)

बॉलिवूडचा छोटा नवाब आणि बेबो करीना कपूर यांचा सुपुत्र तैमूर अली खान Taimur Ali Khan) आज पाच वर्षांचा झाला आहे. मुलाच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने करीनाने सोशल मीडियावर एक छानसा व्हिडिओ शेअर करून तैमूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत एक भावूक पोस्ट लिहून तैमूरला तिने टायगर म्हटले आहे.

Taimur Ali Khan

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय स्टार किड म्हणून तैमूर कायम चर्चेत असतो. या वर्षी त्याच्या पाचव्या वाढदिवसाला त्याची मॉम मात्र क्वारंटाईन झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच करीनाला करोना झाला असल्याने तिने स्वतःला घरातच अलग केले आहे. परंतु तिने लेकाचा एक छान व्हिडिओ शेअर केला आहे.

छोटा टिम आपल्या छोट्या छोट्या पावलांनी चालतानाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून तैमूर पहिल्यांदाच चालण्याचा प्रयत्न करत असल्याचे कळते. या व्हिडिओमध्ये करीनाने तैमूरला हॅपी बर्थ डे करून त्याला हार्टबीट असे म्हटले आहे.

Taimur Ali Khan

करीनाने आपल्या लाडक्या लेकाचे फोटो आणि व्हिडिओज्‌ नेहमीप्रमाणे इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट त्याच्याच फोटोंनी भरलेलं असतं. त्यातलाच एक गोड व्हिडिओ शेअर करत तिनं लिहिंलंय – तुझं पहिलं पाऊल… पहिल्यांदाच पडणं… मी अतिशय अभिमानाने हे सर्व रेकॉर्ड केलं होतं. तुझं असं पडणं पहिलं आणि शेवटचं आहे, लाडक्या. मला विश्वास आहे की, तू नेहमी प्रगतीशील राहण्याचा प्रयत्न करशील. नेहमी ताठ मानेने चालशील. कारण तू माझा टायगर आहेस. हॅपी बर्थ डे माय हार्टबीट, माझा टिमटिम, तुझ्यासारखं कोणीही नाही. # हॅपी बर्थ डे टिमटिम. # माझा मुलगा…. # माझा टायगर