सैफ आणि करीनाने खरेदी केल्या दोन दिवसांत दोन नव...

सैफ आणि करीनाने खरेदी केल्या दोन दिवसांत दोन नव्या महागड्या गाड्या (Kareena Kapoor-Saif Ali Khan Buy 2 New Luxurious Cars In 2 Days, Little Taimur And Jeh Enjoyed The First Ride)

सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या आलिशान गाड्यांमध्ये नुकतीच एक नाही तर दोन नवीन गाड्यांची भर पडली आहे. सर्वात आधी त्यांनी एक महागडी काळ्या रंगाची जीप रँग्लर खरेदी केली, ज्यामध्ये तैमूरने पहिल्या राईडचा आनंद लुटला.

त्यानंतर काल त्यांनी एक नवीन पांढरी मर्सिडीज खरेदी केली त्या गाडीच्या पहिल्या राईडचा आनंद छोट्या जेह बाबाने घेतला. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कारमध्ये जेहसोबत त्याची नॅनीही दिसत आहे. या फोटोंवर काहींनी कमेंट केली आहे की, जेहपेक्षा या राइडची मजा त्याची नॅनीच जास्त घेताना दिसते.

काही दिवसांपूर्वीच करीना आणि सैफने या महागड्या गाड्या बुक केल्या होत्या. टेस्ट ड्राइव्हनंतर त्यांनी या गाड्या घरी आणल्या आहेत.  लोक कार घेण्यासाठी शोरूममध्ये जातात पण करीना आणि सैफची कार त्यांच्या घरी पोहोचली होती.

करीनाचे कार उलगडतानाचे फोटो व्हायरल झाले ज्यात ती कॅज्युअल ब्लॅक टी-शर्ट आणि काळा पायजामा या लूकमध्ये दिसली होती. तर जेह बाबा तिच्या कडेवर होता. मर्सिडीज गाडीच्या पहिल्या राइडचा आनंद जेह बाबाने घेतला. त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

 जीप रँग्लरबद्दल बोलायचे झाल्यास, सैफला खूप आधीपासून ही गाडी घ्यायची होती. सैफला महागड्या वाहनांची खूप आवड आहे. सैफच नाही तर करीनालाही कारची खूप आवड आहे. या कारबद्दल बोलायचे झाले तर तिचे दोन प्रकार आहेत.

एकीची किंमत 57 लाख आणि दुसरी 63 लाख आहे. जीप रँग्लर अतिशय आरामदायी आहे आणि खराब रस्त्यावरही ती मस्त चालते. ही गाडी खास ऑफ-रोडिंगसाठीच बनवलेली आहे.

सैफ आणि करीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सैफचा नुकताच विक्रम वेधा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर करीनाचा लाल सिंह चड्ढा मात्र बॉक्स ऑफिसवर संपूर्ण फ्लॉप झाला.