सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत, करीनाचा लंडनमध...

सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत, करीनाचा लंडनमधील ‘रोलिंग स्टोन्स कॉन्सर्ट’मध्ये सहभाग; करीना कपूर खानने शेअर केले मॅचिंग पोशाखातील फोटो (Kareena Kapoor, Saif Ali Khan And Taimur Don Matching Outfits As They Head To A Rolling Stones Concert, Actress Shares Photos)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे सध्या त्यांची दोन मुले तैमूर आणि जेहसोबत लंडनमध्ये सुट्टी घालवत आहेत. करीना तेथून त्यांचे फोटो शेअर करून चाहत्यांना सतत अपडेट्स देत आहे. अलीकडेच करिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीजमध्ये ताज्या घडामोडी शेअर केल्या आहेत, या स्टोरीजमध्ये ती पती सैफ आणि मुलगा तैमूरसोबत मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसत आहे. एका संगीत कार्यक्रमाला जाताना हे फोटो काढण्यात आले आहेत.

लंडन हे करीनाचे आवडते पर्यटन स्थळ आहे. सध्या ती सैफ अली खान आणि दोन्ही मुलांसोबत तेथे सुट्टी एन्जॉय करत आहे. यासोबतच त्यांच्या आवडत्या ठिकाणांची सुंदर झलकही चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत आहे.

नुकतेच करिना, पती सैफ आणि मुलगा तैमूरसोबत लंडनमध्ये एका संगीताच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचली होती. ‘जब वी मेट’ फेम करिनाने त्याचीही झलक चाहत्यांना दाखवली आहे.

करिनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. लंडनच्या हाइड पार्कमध्ये ती कुटुंबासह प्रसिद्ध रॉक बँड ‘द रोलिंग स्टोन्स’मध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना ही छायाचित्रे काढण्यात आली होती. अभिनेत्रीने ही छायाचित्रे तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये जोडली आहेत. या जोडलेल्या फोटोंमध्ये करीना कपूर खान, तिचा पती सैफ अली खान आणि मोठा मुलगा तैमूर रॉकिंग स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहेत.

करिनाने शेअर केलेल्या या लक्षवेधी फोटोंमध्ये आणखी एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे तिघेही मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसत आहेत. सर्वांनी काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे आणि तिघांच्या टी-शर्टवर रोलिंग स्टोन्सचा लोगो बनवला आहे. करीना कपूर आणि सैफ अली यांनी टी-शर्टसह लेदर जॅकेट घातले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांच्या केसांची स्पाइक स्टाईल बनवली आहे.

सैफ आणि तैमूर सोबतच्या एका फोटोवर करिनाने कॅप्शन लिहिली आहे की – आम्ही इथे येत आहोत आणि दुसऱ्या फोटोला ‘दी रोलिंग स्टोन्स बेबी’ असं लिहिलंय.

करिना कपूरचा आगामी चित्रपट ‘लाल”सिंह चड्ढा’चे शूटिंग संपले असून आता ती कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.