लोकसंख्या वाढवण्यात सैफचे आधीच मोठे योगदान, असे...

लोकसंख्या वाढवण्यात सैफचे आधीच मोठे योगदान, असे सांगून करीनाने केले गरोदरपणाचे खंडन (Kareena Kapoor responds to pregnancy rumours: ‘Saif Ali Khan has contributed way too much to the population’)

अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कुटुंबासोबत इटलीला सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. बेबो तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.  सध्या ती तिच्या इटलीमधील दिनचर्येचा तसेच तेथील मजामस्तीचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी पोस्ट करते आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर करीना पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

काही फोटो व्हायरल झाल्यानंतर करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या. आता या अफवा थांबत नाही म्हटल्यावर करीनाने आता या बातम्यांवर मौन सोडले आहे आणि आपला संयम न गमावता अत्यंत मजेदार पद्धतीने या बातम्यांमागील सत्य सांगितले आहे आणि तिच्या चाहत्यांना तिची मजेदार शैली खूप आवडली आहे.

इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करत करीना कपूरने सांगितले की , मित्रांनो, ही पास्ता आणि वाइनची कमाल आहे. शांत रहा.. मी गरोदर नाही. देशाच्या लोकसंख्येमध्ये आपले मोठे योगदान असल्याचे सैफचे म्हणणे आहे. करीनाने पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. करीनाचा हा अनोखा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.

सैफ अली खानला 4 मुले आहेत. त्याची पहिली पत्नी अमृता सिंहपासून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत तर दुसरी पत्नी म्हणजेच करीना कपूर खानपासून तैमूर आणि जेह ही दोन मुले आहेत.

करीनाने गेल्या वर्षीच जेहला जन्म दिला होता. तो आता दिड वर्षांचा आहे. दोन दिवसांपूर्वी करिनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिचा बेबी बंप असल्याचे वाटत होते. त्यानंतर ती तिसर्‍यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगायला सुरुवात झाली.  मात्र आता करीनाने स्पष्टीकरण देत सर्वांची बोलती बंद केली आहे.

सध्या करीना कपूर तिच्या व्यावसायिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तिचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.