गरोदरपणाच्या अफवा पसरवणाऱ्यांवर पुन्हा बरसली कर...

गरोदरपणाच्या अफवा पसरवणाऱ्यांवर पुन्हा बरसली करीना (Kareena Kapoor responds to pregnancy rumours again, says- Am I a machine)

अभिनेत्री करीना कपूर खान मागच्या महिन्यात पती सैफ अली खान आणि दोन्ही मुलांसोबत लंडनला सहलीला गेली होती. करीना सतत तिथले तिचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत होती. त्यावेळी करीनाचा असा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये करीनाचे पोट थोडे मोठे झालेले दिसत होते, ते पाहून करीना तिसर्‍यांदा आई होणार आहे असा लोक अंदाज बांधू लागले.

या बातम्या सोशल मीडियावर पसरू लागल्या होत्या. करीनाची प्रेग्नंसी आणि तिच्या मुलांबद्दलचे अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत. करीनाने भारतात परतताच ती गरोदर नसल्याचे स्पष्ट केले होते, पण आता पुन्हा एकदा तिने तिच्या गरोदरपणाच्या अफवा पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

नुकत्याच एका मुलाखतीत करीनाने सांगितले की – ‘ माझा तो फोटो कुणीतरी एडिट केला होता. फोटोत माझे पोट पाहून मला स्वतःलाच आश्चर्य वाटले की माझे पोट खरेच असे दिसते का? तो वाइन किंवा पास्ताचा प्रभाव होता. मी 40 दिवस सुट्टीवर होते, त्यादरम्यान मी किती पिझ्झा खाल्ले हेही आठवत नाही.’करीना पुढे म्हणाली की, ‘मला त्या एडिट केलेल्या फोटोबद्दल फारसे काही वाटत नाही, पण जर एखाद्या महिलेचे वजन वाढले तर सर्वप्रथम लोकांना ती गर्भवती आहे असे का वाटते? लोक म्हणतात की मला आणखी एक मूल होणार आहे. आता मी कोणते मशीन आहे का?

त्याबाबतचा निर्णय तरी मला घेऊ द्या. म्हणूनच मी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम वर आम्ही पण माणसे आहोत आम्हाला आमचे खरे आयुष्य जगू द्या अशी एक पोस्ट शेअर केली होती. मी आठ महिन्यांची गरोदर असताना माझे वजन खूप वाढले होते. पण मी तेव्हाही काम केले. कोणापासून काहीही न लपवता नेहमीच खरे सांगितले. यापूर्वी जेव्हा करीनाला तिच्या वाढलेल्या पोटामुळे ट्रोल केले होते तेव्हा तिने इंस्टाग्राम वर एक स्टोरी शेअर करत म्हटले होते की, मी गरोदर नाही हा सगळा वाईन आणि पास्ताचा प्रभाव आहे. सैफ तर म्हणतो की त्याने आधीच देशाची लोकसंख्या वाढवण्यात खूप योगदान दिले आहे. करीनाचा हा विनोदी अंदाज लोकांना खूप आवडला होता.