करीना कपूरची पहिली लव्हस्टोरी राहिली अधुरी (Kar...

करीना कपूरची पहिली लव्हस्टोरी राहिली अधुरी (Kareena Kapoor Rebelled Against her Mother After Falling in Love at Young Age, Know Her Teenage Love Story)

बॉलीवुडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी करीना कपूर (Kareena Kapoor) ही नेहमीच तिच्या खासगी आणि व्यावसायिक जीवनामुळे चर्चेत असते. सैफ अली खानची बेगम आणि तैमूर व जेह सारख्या गोड मुलांची आई कितीही कामात बिझी असली तरी आपल्या मुलांसोबत आवर्जून वेळ घालवताना दिसते. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की करीनाने सैफ सोबत लव्ह मॅरेज केलं आहे. टशन चित्रपटाच्या वेळेस दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लिव इनमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केलं. परंतु सैफच्या आधी वयाच्या अवघ्या १४-१५ व्या वर्षी करीना एका मुलाच्या प्रेमात पडली होती. एवढेच नव्हे तर त्या मुलासाठी ती स्वतःच्या आईच्या विरोधातही गेली होती.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

तरुण वय हे चंचल असतं, त्यामुळे एखादी व्यक्ती आवडणं हे साहजिक आहे. खरं म्हणजे एका मुलाखती दरम्यान करीना कपूरने आपल्या या बालपणीच्या प्रेमाबाबत खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, लहानपणी ती अतिशय बंडखोर स्वभावाची होती. आणि १४-१५ वर्षांची असताना तिचे एका मुलावर प्रेम जडले होते. तिची आई बबिता यांना जेव्हा तिच्या या प्रेमाबद्दल समजलं तेव्हा त्या रागावल्या.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

करीनाने त्या मुलाशी बोललेलं देखील तिच्या आईला पसंत नव्हते, त्यामुळे आईने घरातील फोन देखील लपवून ठेवला होता. तिने त्या मुलाशी बोलू नये म्हणून बबिताने फोन एका डब्ब्यामध्ये लॉक करून स्वतःच्या रुममध्ये लपवून ठेवला होता.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

करीनाने पुढे सांगितले की, तिला तिच्या मित्रांसोबत बाहेर जायचे होते आणि त्या मुलाला भेटायचे होते. एकदा जेव्हा तिची आई डिनरसाठी बाहेर गेली तेव्हा करीनाने सुरीने रुमचे लॉक तोडले आणि डब्बा तोडून फोन काढला, आणि घरातून निघून गेली.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

करीनाने आपल्या बालपणीच्या प्रेमासाठी आईसोबत बंडखोरी केली होती. परंतु तिच्या आईने त्या मुलाला जराही पसंत केले नाही, त्यामुळे तिचे हे प्रेम पुढे जाऊ शकलं नाही. आता तोच मुलगा तिचा चांगला मित्र आहे, असे तिने सांगितले आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

करीना कपूरच्या कामाबद्दल सांगायचं तर तिचा आमीर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. याशिवाय करीना ‘वीरे दी वेडिंग 2’ आणि ‘तख्त’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.