करीना, मलायका आणि अमृता अरोरा यांना ट्रोलर्स म्...

करीना, मलायका आणि अमृता अरोरा यांना ट्रोलर्स म्हणाले, बुढ्ढी; तर करीना संतापली; अमृताने ट्रोलर्सना घेतलं फैलावर (Kareena Kapoor, Malaika Arora, Amrita Arora Slam Trolls For Calling Them ‘Buddhis’)

ट्रोलर्स बॉलिवूड कलाकारांना अधूनमधून धारेवर धरत असतात. अलिकडेच करीना कपूर खान, मलायका आणि अमृता अरोरा यांना त्यांचं शरीर आणि वयावरून ‘एज शेमिंग’ केलं, तर करीना आणि अमृता संतापल्या. त्यांनी ट्रोलर्सना फैलावर घेतलं.

झालं असं की, करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीला गेलेल्या या तिघींनी आपले फोटो प्रसिद्ध केले. त्यात त्या स्टायलिश दिसत असल्या तरी ट्रोलर्सनी त्यांना ‘एज शेम’ करायला सुरुवात केली. त्याने अमृता त्यांच्यावर जाम भडकली.

त्या एका फोटोवर एका युजरने ‘३ बुढ्ढीयां’ असे म्हणून त्यांची खिल्ली उडवली. अमृता अरोराने त्याचा स्क्रीन शॉट शेअर करून लिहिलं, “मी नेहमीच कमेंट्‌स चेक करते, तेव्हा हा सर्वात वर असतो. इथे बुढ्ढी म्हणण्याचा अर्थ अपमान करणे तर नाही ना? आम्ही वयाने वाढलो आहोत. पण तू बिनकामाचा, बिननावाचा, वयाचा पत्ता नसलेला आहेस. का करतोस तू हे?”

करीना कपूरने अमृताच्या या स्टोरीचा स्क्रीन शॉट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

अमृताच्या वाढलेल्या वजनावरून पण काही युजर्सनी तिला ट्रोल केलं आहे. त्यांना फैलावर घेत अमृता लिहिते, “काही लोकांनी माझ्या वाढलेल्या वजनावर कमेंट केली आहे. पण माझ्या वजनाचं काय करायचं ते मी बघून घेईन. आजकाल प्रत्येक गोष्टीचा त्रास वाढला आहे. तेव्हा तुम्ही असंच वागत राहा. पण यापुढे मी त्याच्या नावानिशी लिहीन.”

अमृताच्या या शेऱ्याचा स्क्रीन शॉट प्रसिद्ध करून मलायकाने आपल्या बहिणीला पाठिंबा दिला आहे. ती लिहिते, “तू बरोबर बोललीस. तू जशी आहेस, तशी सुंदरच आहेस… आणि मित्रांनो, कोणाला फॅट शेम करणे चुकीचे आहे…”

यापूर्वी देखील या तिघींना बॉडी शेम केलेले आहे. कित्येक वेळा त्यांच्यावर ट्रोलर्सनी निशाणा साधला आहे.