करीना कपूरला आवडते एक गृहिणी म्हणून वावरायला, अ...

करीना कपूरला आवडते एक गृहिणी म्हणून वावरायला, अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा (Kareena Kapoor Loves Being A Housewife, Says ‘Managing Home Is My Department, From Ghar Pe Khana Kya Bana Hai To Sahab Kya Kha Rahe’)

करीना कपूर खान केवळ एक अभिनेत्रीच नाही तर दोन लहान मुलांची प्रेमळ आई आणि एक उत्तम गृहिणी देखील आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने आपल्या वैयक्तिक आयुष्याचा खुलासा केला.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानला वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यात संतुलन कसे साधायचे हे माहित आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बेबोने कबूल केले की तिला घराची काळजी घेणे आणि घर सांभाळायला आवडते. अभिनेत्रीने हे देखील उघड केले की घरात काही विशेष गोष्टी आहेत ज्याकडे ती स्वत: जातीने लक्ष देते.

अभिनेत्री करीना कपूर म्हणाली- मला गृहिणीची भूमिका करायला आवडते. सर्व माझे विभाग आहेत. मुलांनी घरी काय खावे याचे नियोजन करण्यापासून, त्याच्या खेळण्याच्या वेळा, त्याचे क्लास सर्वकाही. साधारणपणे घरात कोणते पदार्थ शिजले जातील, साहेब काय खातात – हे सगळं सांभाळायला मला आवडतं. मला मल्टीटास्किंग राहायला आवडते. मला अभिनेत्री होणं, स्टार होणं, गृहिणी असणं – ही सगळी पात्रं साकारायला आवडतात.

अभिनेत्रीने असेही सांगितले की, जेव्हाही माझ्घया री पार्टी असते तेव्हा मी आणखीनच उत्साहित होते. मला घर सांभाळायला आवडते. घरी पाहुणे येणार असतील तर मी स्वतः टेबल साफ करते. नाहीतर मी काही गोष्टी मला हव्या तशा करुन घेते. हे सर्व माझ्या कामाचा भाग आहेत.

42 वर्षीय अभिनेत्रीने असेही सांगितले की मी या सर्व गोष्टी माझी मुलं तैमूर आणि जेह यांना शिकवते. घरातील छोट्या कामात मी त्यांची मदत घेते.

जेव्हा त्यांचे आजी-आजोबा घरी येतात तेव्हा ते खूप उत्साहात असतात. मी तैमूरला, मला टेबल लावायला मदत करायला सांगते. मुलं सैफला घरी स्वयंपाक करताना पाहतात. डिस्नेलँडला जाण्यापेक्षा आमचे एकत्र राहणे अधिक मौल्यवान आहे.