करीना कपूर खानचे दिवाळी पार्टीतील स्टायलिश लूक ...

करीना कपूर खानचे दिवाळी पार्टीतील स्टायलिश लूक पाहून चाहत्यांनी ती ‘स्टाईल आयकॉन’ असल्याचे शिक्कामोर्तब केले (Kareena Kapoor Khan’s Black Outfit Look Proves Why She Is Called The Style Icon)

अलिकडेच करीना कपूर खानने सोशल मीडियावर आपला एक झकास फोटो प्रदर्शित केला आहे. दिवाळी पार्टीत घेतलेला हा फोटो आहे. या पार्टीत करीना सोबत मलायका अरोरा सकट अनेक सौंदर्यवती सामील झाल्या होत्या. तरीपण तिचा वेगळा अविर्भाव बघून, तिच्या फॅशन सेन्सबाबत तिला स्टाईल आयकॉन का म्हणतात, ते दिसून येते.

बॉलिवूडच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात करीना कपूरच्या तोंडी एक संवाद आहे. ‘कौन है वो जिसने मुझे मुडकर नही देखा?’ हा संवाद तिला शंभर टक्के लागू पडतो. कारण चित्रपटातच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनात तिचा अविर्भावच असा असतो, की प्रत्येक जण तिच्याकडे वळून पाहतो.

करीनाने आपल्या इन्स्टाग्राम हॅन्डल वर जे काही फोटो प्रदर्शित केले, त्यामध्ये ती अत्याधुनिक, स्टायलिश काळ्या ड्रेसमध्ये लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ग्लॅम मेकअप आणि लाइट शेड लिपस्टीकने करीनाने आपले रूप पूर्णत्त्वास नेले आहे. केसांचे पोनी टेल बांधून या फोटोमधे तिने ‘नमस्ते’ असे कॅप्शन दिले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर प्रसारित होताच, तिचे चाहते आणि बॉलिवूडच्या तिच्या मैत्रिणींनी लाइक, कमेंटस्‌ आणि फायरवाले इमोजीस टाकून तिला अभिवादन केले आहे. रिया कपूर व शिबानी दांडेकरने तिला ‘स्टनर’ म्हटले आहे.

ज्या दिवाळी पार्टीत करीनाने आपले लक्षवेधी रूप सादर केले, त्यात मलायका अरोरा, अमृता अरोरा, शिबानी दांडेकर, फरहान अख्तर, महीप कपूर, भावना पांडे, सीमा किरण सजदेह यांच्यासह इतरही नामांकित व्यक्ती सामील झाल्या होत्या.