करीना कपूर – खानने शेअर केले सैफ अली खान ...

करीना कपूर – खानने शेअर केले सैफ अली खान आणि तैमूर यांचे ‘टविनिंग अँड विनिंग’ फोटो (Kareena Kapoor Khan Shares UNSEEN Pics Of Saif Ali Khan ‘Twining And Winning’ With Taimur)

सतत सोशल मिडियावर चर्चेत राहण्याचा करीना कपूर-खानला सोस आहे. त्यानुसार तिने अलीकडेच सैफ अली खान आणि मोठा मुलगा तैमूर यांचे न पाहिलेले फोटो प्रसिद्ध केले आहेत. पतौडी संस्थानची बेगम करीना कपूर-खान आपल्या पर्सनल डायरीतले सुंदर क्षण शेअर करत असते त्यामध्ये विशेषकरून मोठा  तैमूर अली लहानग्या जेह यांचे छान छान फोटो शेअर करते.

नुकताच तिने आपला पती  सैफ अली खान आणि मोठा मुलगा तैमूर यांचा न पाहिलेला फोटो दिला आहे. त्यामध्ये दोघांनीही मॅचिंग हॅन्ड बॅन्ड घातला आहे.

सदर फोटोत बाप-लेक कॅज्युअल कापडयांमध्ये दिसत आहेत. सैफ अली ब्लॅक जीन्स आणि ग्रे टी शर्ट घालून आहे, तर छोटे नवाब  तैमूर ब्लॅक जीन्स आणि ब्लॅक टी शर्ट घालून आहे. दोघांनी मॅचिंग, लाल रंगाचे   हॅन्ड बॅन्ड घातले आहेत. त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडलेला दिसतो आहे.या कधीही न पाहिलेल्या फोटोसोबत  ‘टविनिंग अँड विनिंग’  अशी ओळ दिली आहे.