करीना कपूर खानच्या बेबी बम्पचे फोटो : योगासन कर...

करीना कपूर खानच्या बेबी बम्पचे फोटो : योगासन करताना दिसतेय करीना (Kareena Kapoor Khan shares her Baby Bump Pics while doing Yoga)

करीना कपूरची बाळंतपणाची तारीख जवळ येत आहे. आपल्या दुसऱ्या बाळंतपणासाठी देखील ती पहिल्या इतकीच उत्साही दिसत आहे. बाळंतपणातही करीनाने अजूनपर्यंत कामातून सुट्टी घेतलेली नाही. काम आणि स्वतःचे आरोग्य अशा दोन्ही गोष्टी तिने अगदी व्यवस्थित मॅनेज केलेल्या आहेत. अलीकडेच करीनाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत, या फोटोंमध्ये ती योग करताना दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी स्वतःचे प्रोफेशनल तसेच पर्सनल फोटोही ती वेळोवेळी शेअर करत असते. आताच्या फोटोमध्येही तिने आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर केले आहेत. करीनाचे हे फोटो पाहून नक्कीच तिच्या चाहत्यांची बाळाच्या आगमनाबाबतची उत्सुकता वाढणार आहे.

फोटोसौजन्य: इंस्टाग्राम

करीनाचे बेबी बम्प दाखविणारे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे आहेत. ‘थोडासा योग आणि थोडी शांती’ असा मजकूर तिने या फोटोंसोबत लिहिलेला आहे. करीनाने आपल्या स्ट्रेचिंग करत असलेल्या फोटोंमध्येही एक पोस्ट टाकली आहे, ज्यात तिने, ‘मी जास्तीत जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करत आहे’, असे म्हटले आहे.

फोटोसौजन्य: इंस्टाग्राम

फोटोसौजन्य: इंस्टाग्राम

फोटोसौजन्य: इंस्टाग्राम

करीना कपूर आणि सैफ अली खान दोघं उभयता आपल्या दुसऱ्या बाळाचं स्वागत नवीन घरात करण्याकरीता आपल्या नवीन घरी शिफ्ट झाले आहेत. आपल्या नव्या घराचे फोटोही करीनाने यापूर्वी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. करीना सध्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटासाठी काम करत आहे. दिग्दर्शक अद्वैत चंदन यांच्या या चित्रपटामध्ये करीना, आमिर खानसोबत अभिनय करणार असून हा चित्रपट ‘फारेस्ट गंप’ या टॉम हँक्सच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. वर्षअखेर ‘लाल सिंह चड्ढा’ प्रदर्शित होईल. करीनाला तिच्या बाळंपणासाठी अनेक शुभेच्छा!