जागतिक योग दिनानिमित्त करीनाने शेअर केला जेहचा ...

जागतिक योग दिनानिमित्त करीनाने शेअर केला जेहचा योगा करतानाचा फोटो (Kareena Kapoor Khan Shares An Adorable Picture Of Her Son Jeh Doing Yoga On International Yoga Day, See Cute Pic)

आज 21 जूनला सर्वत्र ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जात आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा करतात व इतरांनाही तो करण्याचा सल्ला देतात. या यादीत अभिनेत्री मलायका अरोरापासून ते करीना कपूर खानचे नाव सहभागी आहे. अभिनेत्री करीना कपूर अनेकदा आपले योगा करतानाचे फोटो शेअर करत असते. पण आज जागतिक योग दिवसानिमित्त करीनाने स्वत:चा नाही तर तिच्या लहान लेकाचा म्हणजेच जेहचा योगा करतानाचा गोड फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

करीनाला योगा करायला किती आवडते हे आपण तिच्या पोस्टमध्ये पाहतच असतो. शिवाय ती अनेकदा तिच्या मुलांचे म्हणजेच तैमूर आणि जेह काही गोड क्षण क्लिक करुन सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आज योग दिनाच्या निमित्ताने करीनाने जेहचा एक खूपच गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोत जेह एक योगा पोज देताना दिसतो. या सोबतच तिने ‘’बॅलन्स हा आयुष्यात आणि योगा या दोन्ही ठिकाणी महत्वाचा असतो. सगळ्यांना योग दिवसाच्या शुभेच्छा. माझा जेह बाबा ”असे कॅप्शन दिले आहे.

या फोटोत जेह योगाच्या प्लॅन्क्स पोझिशनमध्ये उभा दिसतो. त्याच्या या क्युट फोटोवर तिच्या चाहत्यांपासून अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केल्या आहेत. जेहची आत्या अभिनेत्री सोहा अली खानने माशाअल्लाह लिहून हार्ट इमोजीने कमेंट केली आहे.

गेल्या वर्षी चाहत्यांना योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी करीनाने सैफसोबत तैमूर योगा करतानाचा फोटो शेअर केला होता. तो फोटोसुद्धा चाहत्यांना खूप आवडलेला.

जेह 8 महिन्यांचा झाला तेव्हा करीनाने जेह कसा योगा करतो हे दाखवणारा फोटो शेअर केला होता. त्यासोबत तिने, ”तुम्ही पाहू शकता योग संपुर्ण कुटुंब करते. 8 महिने… माझा मुलगा” असे कॅप्शन दिले होते.

करीना तिच्या फिटनेसची नेहमीच काळजी घेत असते. तिच्या फिटनेस मध्ये योगाचा समावेश प्रामुख्याने असतो. गरोदरपणाच्या काळात सुद्धा करीनाने नियमितपणे योगा केला होता. त्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करायची. एका मुलाखतीत करीनाने सांगितलेले, की योगामुळेच तिचा गरोदरपणातील आत्मविश्वास वाढला होता. जेहच्या जन्मानंतर योगा करुनच तिने तिचे वजन कमी केले होते.