मुलाला तैमूरला सोडून लंडनला शुटिंगसाठी जाताना क...

मुलाला तैमूरला सोडून लंडनला शुटिंगसाठी जाताना करीना झाली उदास, म्हणते – त्याला सोडून जाण्याच्या विचारानेच पोटात गोळा येतो (Kareena Kapoor Khan says her ‘stomach was in knots’ before going to London leaving back Taimur)

करीना कपूर खान तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या लंडनला पोहोचली आहे. धाकटा मुलगा झेहच्या जन्मापासून, करिनाने करिअरमधून ब्रेक घेतला होता. दरम्यान तिने तिचा बराचसा वेळ आपली मुलं झेह आणि तैमूर, सैफ अली खान आणि कुटुंब यांच्यासाठी दिला. पण आता जेह थोडा मोठा झाल्यामुळे, करिनाने पुन्हा एकदा आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. सध्या तिच्याकडे काही चांगले प्रोजेक्ट तर आहेतच, शिवाय ती हंसल मेहतासोबत प्रोड्युसर म्हणून नवीन सुरुवात करणार आहे. त्याच संदर्भातील एका प्रोजेक्टसाठी ती हंसल मेहतासोबत लंडनमध्ये आहे, पण तिचा लाडका तैमूर या ट्रिपमध्ये तिच्यासोबत नाही आणि तैमूरला सोडून जाणे तिच्यासाठी किती कठीण आहे, याविषयी तिने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते आणि तैमूरला सोडून गेल्यावर तिची काय अवस्था झाली होती हेही तिने सांगितले होते.

करीना कपूर ही व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात परिपूर्ण संतुलन कसे साधता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण आहे. ती केवळ तिच्या करिअरवरच लक्ष देत नाही, तर तिच्या मुलांवर आणि कुटुंबाकडेही तिचे पूर्ण लक्ष असते. करीना बरेचदा तिच्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाइम घालवताना दिसते. ती दररोज फॅमिली व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

माझे कुटुंब माझे प्राधान्य आहे

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान करीना म्हणाली, “माझे प्राधान्य अर्थातच माझे कुटुंब आहे – माझी मुले, माझे पती, आई-वडील, बहीण – हे माझ्यासाठी सर्वकाही आहेत.” हंसल मेहताच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगसाठी करिना नुकतीच जेहसोबत लंडनला रवाना झाली आहे. जाण्यापूर्वी तिने तैमूर अली खानला सोडून जाणे तिच्यासाठी किती कठीण होते, हे सांगितले. ती म्हणाली, “मला माहीत आहे की माझ्या मुलांना माझी गरज आहे. हंसलच्या शूटसाठी मला दोन दिवसांनी निघायचे आहे, पण जाण्यापूर्वी माझ्या पोटात गोळा येत आहे कारण मला तैमूरला सैफसोबत सोडून जावे लागणार आहे.”

आमच्यापैकी कोणीतरी एकाने मुलांसोबत असावे

करीना कपूर आपल्या मुलांचे ज्या पद्धतीने संगोपन करताना दिसते त्याचे सर्वजण कौतुक करतात. करिअरसोबतच आपल्या दोन्ही मुलांना पूर्ण वेळ देता यावा याचीही ती काळजी घेते. आपल्या या पालकत्वाच्या शैलीबद्दल बोलताना करीना म्हणते, “मी आणि सैफ आम्हा दोघांपैकी एकाने मुलांसोबत असावे, हे ठरवूनच आम्ही आमच्या कामाचे नियोजन करतो. नुकतेच सैफने ‘आदिपुरुष’चे काम पूर्ण केले आहे, त्यामुळे आता माझ्यावर काम करण्याची वेळ आली आहे. असे आलटूनपालटून आम्ही आमच्या कामाचे नियोजन करतो. पण तरीही मुलांना सोडून जाणे सोपे नाही.”

कुटुंबासाठी चांगले चित्रपटही सोडू शकते

आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल की करीना कपूर खान आपल्या कुटुंबाला किती प्राधान्य देते. एवढेच नाही तर कुटुंबाला वेळ देण्यासाठी ती काही चांगले चित्रपट नाकारूही शकते. ती म्हणते, “एखादा चांगला चित्रपट किंवा भूमिका आली तर मी ती करावी असा मोह मला होतो, पण जर मला माझ्या कुटुंबासाठी किंवा मुलांसाठी काही चांगले चित्रपट किंवा स्क्रिप्ट सोडायच्या असतील तर मी तो चित्रपट सोडून माझ्या मुलांसोबत वेळ घालवण्यास प्राधान्य देणे योग्य समजते.”

करिनाच्या कामाबद्दल सांगायचे तर तिने लंडनमध्ये हंसल मेहता यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. याशिवाय सुजॉय घोष आणि रिया कपूरचे प्रोजेक्ट्सही तिच्या हातात आहेत.