करीना कपूर आणि सैफ अली खान निघाले मुलांना घेऊन ...

करीना कपूर आणि सैफ अली खान निघाले मुलांना घेऊन परदेश सहलीला: विमानतळावरीन त्यांचे फोटो प्रसारित (Kareena Kapoor Khan Saif Ali Khan And Taimur Ali Khan Clicked At Airport, See Photos And Videos)

करीना कपूरला आपल्या कामातून फुरसत मिळाली की, ती मुलाबाळांना घेऊन सुट्टी एन्जॉय करायला निघते. गेल्यावेळी ती कुटुंबासह लंडन आणि इटली येथे गेली होती. पुन्हा ती आपली दोन मुले व नवऱ्याला घेऊन सहलीला निघाली आहे. तिला मुंबईच्या विमानतळावर बघितले गेले.

करीना कुटुंबासह विमानतळावर दिसताच तिला छायाचित्रकारांनी गाठले.

करीना मुलाबाळांसह कॅमेऱ्यासमोर पोझेस देताना खूपच आनंदित झाली होती. सुट्टी घालविण्यासाठी निघालेल्या या सुखी कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

करीना कामात कितीही गर्क असली तरी ती आपल्या कुटुंबाला प्राधान्य देते.

ती अशी अभिनेत्री आहे, जी आपला जास्तीत जास्त वेळ मुलाबाळांसाठी राखून ठेवते.

या फोटोंमध्ये चेक्सचा शर्ट घातलेला छोटा तैमुर अगदी मजेत पोज देतो आहे.  छोटा नवाब जेह अली खान सेविकेच्या कडेवर झोपलेला दिसत आहे.

तर कॅज्युअल वेअर्समध्ये करीना आणि सैफ अली खान छान दिसत आहेत.