करीना कपूरचं गर्भारपणातील अ...

करीना कपूरचं गर्भारपणातील अनुभव सांगणारं पुस्तक प्रसिद्ध (Kareena Kapoor Khan Launches Book On Pregnancy)

बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट केल्यानंतर करिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. करिनाचा अल्ट्रासाउंड कॉपी दाखवतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो दाखवून, करीना नक्की काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे, हे लोकांना समजलेले नाही. त्यामुळे चाहत्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून करिनाला भांडावून सोडलं आहे. करिनाच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला ‘तू पुन्हा आई होणार आहेस का?’ अशा आशयाचे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. पण करिनाच्या या पोस्टचा अर्थ काही वेगळाच आहे.

करिना कपूरनं हा फोटो शेअर करताना लिहिलं,’एका वेगळ्या आणि रंजक विषयावर काम करत आहे. पण तुम्ही विचार करताय तसं काही नाही आहे.’ पण करिनाच्या चाहत्यांनी मात्र या पोस्टवरून तिला प्रेग्नन्सीबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. परंतु युझर्स विचार करत आहेत असं काही नाहीये. करिना पुन्हा आई होणार नाही आहे.

करिना कपूरनं एक पुस्तक लिहिलं आहे. ज्यात तिनं दोन्ही मुलांच्या गर्भारपणाच्या वेळचे तिचे अनुभव आणि माहिती दिली आहे. याच पुस्तकाला तिनं आपलं ‘तिसरं बाळ’ म्हटलं आहे. या पोस्टनंतर करिनानं आणखी काही पोस्ट करत आपल्या पुस्तकाची माहिती दिली आहे.

करिना कपूरनं २०१६ साली पहिला मुलगा तैमुरला जन्म दिला, त्यानंतर २०२१ मध्ये ती पुन्हा एकदा आई झाली आहे. पण चाहत्यांना तिच्या दुसऱ्या मुलाची झलक अद्याप पाहायला मिळालेली नाही. तैमूरला लाडाने ते ‘टीम’ असे म्हणतात. तर आता सैफ त्याच्या दुसऱ्या मुलाला ‘जेह’ अशी हाक देत असल्याचे समोर आले आहे. आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती म्हणजे सैफ आणि करीना त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव काय असणार हे जाणून घेण्याची. अशातच करीनाने सोनोग्राफीचा फोटो शेअर केल्याने ती पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.