मालदीवहून काळ्या बिकिनीतील ...

मालदीवहून काळ्या बिकिनीतील कडक सेल्फी पाठवून करीना कपूरचा निःश्वास, ‘उन्हाळा तर संपला…’ (Kareena Kapoor Khan Drops A Sizzling Hot Picture In Black Bikini As She Says Bye To Summer In Maldives)

करीना कपूर सध्या पती सैफ आणि दोन्ही मुलांसोबत मालदीवला आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. तेथेच तिने तिचा ४१वा वाढदिवसही साजरा केला आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असलेली बेबो सध्या मालदीव येथून तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे.

Kareena Kapoor Khan, Sizzling Hot Picture

करीनाने नुकतेच तिचा जो फोटो शेअर केला आहे, त्यात तिने स्टायलिश ब्लॅक बिकिनी घातली आहे आणि त्यावर एक व्हाइट शर्ट घातला आहे. हा तिचा मिरर सेल्फी आहे. या फोटोमध्ये करीना भलतीच फिट दिसत आहे. दोन बाळंतपणानंतरही बेबोची फिटनेस पाहून चाहत्यांना तिचं कौतुक वाटत आहे.

Kareena Kapoor Khan, Sizzling Hot Picture

करीनाने या फोटोलो ‘उन्हाळा तर संपला…’ अशी कॅप्शन दिली आहे. याआधी करीनाने २१ सप्टेंबरला वाढदिवस साजरा केला होता आणि त्याचे काही फोटो शेअर केले होते. अन्‌ सर्व चाहत्यांचे आभार मानले होते.

Kareena Kapoor Khan, Sizzling Hot Picture

करीनाने तिच्या इन्स्टास्टोरीवर अर्जुन कपूरने शेअर केलेला एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात अर्जुन कपूर बेबोला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. या फोटोत सैफ, अर्जुन आणि तैमुर स्पष्ट दिसताहेत पण करीना मात्र मागे राहिली आहे. त्यामुळे अर्जुनने हा फोटो शेअर केल्याबद्दल माफी मागितली होती. पण करीनाला मात्र हा फोटो आवडला आहे.

कामाचं बोलायचं तर करीनाचा आमिर खानसोबतचा लाल सिंह चढ्ढा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल.