करीनाने कामावर निघण्यापूर्वी लेकासोबत दिल्या फो...

करीनाने कामावर निघण्यापूर्वी लेकासोबत दिल्या फोटोसाठी पोज, सेलिब्रेटींनी केला कमेंटचा वर्षाव (Kareena Kapoor Goes ‘Jeh Baba Kaam Par Chalo’ As She Drops PICS With Her Son In Swag, Alia Bhatt Says,Superstars’)

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि स्टाईलने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या करीना कपूरने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये करीना अतिशय जबरदस्त आणि स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे फोटोत तिचा लहान मुलगा जेहसुद्धा स्टाइलिश लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने लंडनमधून हे फोटो शेअर केले आहेत.

 आपल्या किलर लूकने अनेकांच्या हृदयांची धडकन बनलेली करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये निर्माता हंसल मेहता यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अभिनेत्रीने शूटिंगला निघण्यापूर्वी आपल्या लहान मुलासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये माय-लेकाचा स्वॅग पाहायला मिळत आहे.

या शेअर केलेल्या फोटोंमध्ये जेह बाबासुद्धा खूप गोड दिसत आहे. त्याने आपल्या आईचा हात पकडून कॅमेऱ्यासमोर पोज दिली आहे.

करीनाने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच काही मिनिटांतच या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव झाला. या फोटोंसाठी करीनाने कॅप्शनमध्ये, ‘माझ्या मुलासोबत कामावर जाते पण कामावर जाण्यापूर्वी झटपट पोझ देते # जेहबाबा #चला कामाला जाऊया…”असे कॅप्शन दिले आहे.

या फोटोंमध्ये करीनाने छोट्या जेहचा हात पकडला आहे. अभिनेत्रीने या फोटोंमध्ये पांढऱ्या पफर जॅकेटसह डेनिम आणि पांढरे शूज घातले आहेत. तर छोटा जेहने काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. आणि डोळ्यांवर काळ्या रंगाचे सनग्लासेस लावले आहेत. ते परिधान करून तो कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. ते पाहून केवळ चाहतेच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीही करीना आणि जेहच्या फोटोंना लाईक आणि कमेंट करत आहेत. करीनाची बहीण करिश्मा कपूरने “माय लव्ह” अशी कमेंट केली आहे. तर आलिया भट्टनेही ‘सुपरस्टार’ अशी कमेंट केली आहे.