करीना कपूरने १०८ वेळा सूर्यनमस्कार घातले; तरी ल...

करीना कपूरने १०८ वेळा सूर्यनमस्कार घातले; तरी लोक करताहेत निंदा (Kareena Kapoor Gets Trolled For Doing 108 Times Surya Namaskar)

पूर्वी अभिनय, सौंदर्य आणि स्टाईल सेन्ससाठी सर्वांकडून प्रशंसली जाणारी करीना कपूर आता काहीही केले तरी ट्रोल होते. सैफसोबत लग्न, नंतर तैमूरचं नाव, मग धाकट्या लेकाचं नाव आणि नंतर तिच्या गर्भधारणेच्या पुस्तकाचं शीर्षक यावरून करीनाला सतत लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं आहे.

आता तर तिने काही चांगलं केलं तरी लोक तिला ट्रोल करण्याची संधी शोधून काढू लागलेत. आता हेच पाहा ना, करीनाने अगदी नुकतेच तिचा १०८ वेळा सूर्यनमस्कार घालतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि लिहिलंय – ‘१०८ वेळा सूर्यनमस्कार केले, आभारी आहे आणि आज रात्री भोपळा पाई खाण्यासाठी मी तयार आहे.’

साहजिकच या व्हिडिओमध्ये करीनाचा फिटनेस स्पष्ट दिसत आहे आणि अनेक यूजर्स तिच्या फिटनेसचे कौतुकही करत आहेत, मात्र तिच्यावर टीका करणारेही अनेकजण आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हे तुम्ही चुकीचे करत आहात…’ एकाने लिहिले – ‘मुस्लिमांमध्ये योग करणे गुन्हा आहे… उघड्यावर करू नका… नाहीतर मौलवी फतवा काढेल…’

काही युजर्स म्हणत आहेत की, शेवटचे ३ रेकॉर्ड करायचे आहेत का फक्त… असे तर मी खूप करेन … एका यूजरने म्हटलंय की, तरीही तू तरुण होणार नाही आहेस, फिटनेससाठी तुझ्या बहिणीचा सल्ला घे… काहींनी करीनाची खिल्ली उडवत लिहिलंय की, लोक योग करून बारीक होतात, तुम्ही जाड होत आहात…

बरेच चाहते करीनाचे कौतुकही करत आहेत, काही तिला फिटनेस क्वीन म्हणत आहेत तर काही परफेक्ट म्हणत आहेत.

व्हिडिओमध्ये करीना मोकळ्या जागेवर योग करताना दिसत आहे आणि तिने गुलाबी स्पोर्ट्स ब्रा आणि काळी ट्रॅक पॅन्ट घातली आहे. चाहते तिला प्रेरणादायी म्हणत आहेत.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर करीना लवकरच आमिर खानसोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम (सर्व फोटो)