करीना कपूरने शेअर केले, तैमुरच्या राजस्थान सहली...

करीना कपूरने शेअर केले, तैमुरच्या राजस्थान सहलीचे फोटो (Kareena Kapoor Drops Taimur’s Pics From Rajasthan Trip)

करीना कपूर आपला नवरा सैफ अली खान आणि तैमुर  व जेह या दोन मुलांसह राजस्थानच्या दौऱ्यावर आहे. तिकडे ही मंडळी सहलीचा आनंद घेत  आहेत. या राजस्थान सहलीचे फोटो करिनाने इन्स्टाग्राम स्टोरीज वर पोस्ट केले आहेत.

एका आलिशान , पंचतारांकित हॉटेलच्या परिसरात हे खान कुटुंब बागडत असल्याचे हे फोटो आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या करीना कपूर-खानने चिमुकला तैमुरचा एक फोटो प्रसिद्ध केला आहे. ४ वर्षांचा तैमुर स्ट्राईप टी शर्ट आणि येलो शूज घालून छान दिसतो आहे. ‘मेरे जीवन का प्यार’ अशी ओळ करिनाने या फोटोवर लिहिली आहे. करीना आपल्या कुटुंबासह राजस्थानात सुट्टी घालवत आहे. गेल्या २ महिन्यातील त्यांची ही दुसरी सहल आहे. सप्टेंबर महिन्यात करीना आपला वाढदिवस साजरा करायला , नवरा-मुलांसह मालदीव बेटांवर गेली होती.