बाळंत होऊन करीना नवीन घरात जाणार का? (Kareeena ...

बाळंत होऊन करीना नवीन घरात जाणार का? (Kareeena Kapoor is moving into a new home ahead of their second baby’s arrival)

गर्ल गँगसह केलेल्या पार्टीचे फोटो आलेत
करीना कपूर आपल्या दुसऱ्या गर्भारपणापासून खूपच चर्चेत आहे. लवकरच ती बाळंत होईल. मात्र आपले गर्भारपण ती बिनधास्त एंजॉय करते आहे. काही दिवसांपूर्वी तिनं आपल्या गर्ल गँगला एक झकास मिडनाईट पार्टी दिली. त्याचे फोटो तिनं चाहत्यांसाठी शेअर केलेत. मलाइका व अमृता अरोरा, करीश्मा कपूर, मल्लिका भट्ट अशा तिच्या मैत्रिणी मस्तीच्या मूडमध्ये त्यात दिसत आहेत. सर्वजणी रात्रीच्या ड्रेसमध्ये आहेत. त्यावरून असे वाटते की, ही मिडनाईट पार्टी असावी. करीना कफ्तान ड्रेसमध्ये आहे तर करिश्मा नाईट सुटात. या फोटोंना चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांना असा अंदाज केला आहे की, बाळंत झाल्यावर करीना सैफसह नव्या घरात प्रवेश करील. म्हणजे दुसऱ्या बाळाचे स्वागत नवीन घरात होईल. तिचे हे नवे घर फॉर्च्युन बिल्डींगमध्ये आहे, जी त्यांच्या आत्ताच्या घरासमोरच आहे. त्यामुळे या नवीन घराच्या अंतर्गत सजावटीवर देखरेख करण्यासाठी हे दोघे तिथे रोजच जातात.

नव्या बाळाच्या आगमनासाठी त्यांच्या घरातील सगळेच उत्सुक आहेत. सैफने देखील जाहीर केलं आहे की, शुटिंगमधून सुट्टी घेऊन तो करीना सोबत जास्त वेळ राहील. करीनाचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट येऊ घातला आहे. यात तिचा नायक आमीर खान आहे. याचे शूटिंग तिने आधीच पूर्ण केले आहे. मात्र ‘व्हॉट वूमन वॉन्ट’ या कार्यक्रमाचे शूटिंग ती गर्भारपणातही करत होती