करणवीर बोहरा आणि पूनम पांडे यांनी खुलेआम केलेला...

करणवीर बोहरा आणि पूनम पांडे यांनी खुलेआम केलेला रोमान्स पाहून नेटकरी करवादले ‘ हा भाई आपल्या घटस्फोटाची खबर लवकरच देणार….’ (Karanvir Bohra Gets Trolled As He Gets Cosy And Gives Romantic Pose With Poonam Pandey, Netizens Say- Ye Apna Divorce Khud Confirm Kar Raha Hai)

करणवीर बोहरा आणि पूनम पांडे सध्या अनेकदा एकत्र दिसत आहेत. अलीकडेच, पूनमसोबत अभिनेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो पूनमला उचलून घेऊन फिरत होता. यानंतर करणवीरलाही खूप ट्रोल करण्यात आले. त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये करणवीरला तो नशेत आहे असे म्हटले, तर कुणी त्याला छपरी देखील म्हटले.


आता पुन्हा एकदा पूनम आणि करण एकत्र दिसले आणि त्यावेळचे त्यांचे कृत्य पाहून सगळेच हैराण झाले. या व्हिडिओमध्ये करणने पूनमचा चेहरा हातात धरला आहे आणि तो पूनमच्या डोळ्यात टक लावून सतत पाहत आहे. त्याचवेळी पूनमही करणकडे प्रेमाने बघताना दिसत आहे.

त्याचवेळी व्हिडीओत पापाराझींचा इकडे बघ भाऊ असा आवाज येतो, त्यावर करण म्हणतो की मी हे बघू की तुला बघू, चल तुलाच पकडून बघतो…खरेतर करण त्यावेळी मजेच्या मूडमध्ये होता, पण चाहत्यांना करणचा पूनमसोबतचा हा रोमान्स आवडलेला नाही.


फॅन्स कमेंटमध्ये , तो स्वत: त्याच्या घटस्फोटाची तयारी करत आहे असे लिहित आहेत. तर एका युजरने लिहिले, आता पुढची बातमी करणच्या घटस्फोटाची आहे… काही युजर्स असेही म्हणत आहेत की, घटस्फोटाचा संकेत दिसला तर टीजे करणचे घरी चप्पल घालून स्वागत करेल. तर काहीजण त्यांना छपरी आणि ठरकी म्हणत आहेत.
यावेळी पूनमने खूप बोल्ड क्रॉप टॉप घातला होता आणि करण कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. ते दोघेही त्यांच्या आगामी म्युझिक व्हिडिओ तेरे जिस्म सेच्या पोस्टर लाँचसाठी एकत्र जमले होते. पण चाहत्यांना मात्र त्यांचा खुलेआम रोमान्स करणे जराही आवडले नाही.