बिपाशाच्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाला करण सिंह ग्...

बिपाशाच्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाला करण सिंह ग्रोवर, भावनिक नोट लिहून म्हणाला मी स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करत आहे (Karan Singh Grover pens a heartfelt note post Bipasha Basu’s pregnancy, Writes- I feel myself constantly changing)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर लग्नाच्या 7 वर्षानंतर आईबाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी एक रोमॅण्टिक फोटो शेअर करुन ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली. बिपाशा गरोदरपणाच्या तिसऱ्या टप्प्यात असून ती लवकरच बाळाला जन्म देणार आहे. या छोट्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी दोघेही खूप उत्सुक आहेत. दरम्यान, करणने बिपाशाच्या गरोदरपणाबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे आणि तो स्वतःला कसा बदलण्याचा प्रयत्न करत आहे हे त्यात लिहिले आहे.

करण सिंग ग्रोव्हरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर बिपाशा बसूच्या मॅटर्निटी शूटचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये बिपाशा काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये आपल्या बेबी बंपचे प्रदर्शन करत आहे. या पोस्टद्वारे करणने पहिल्यांदाच आपल्या भावना शेअर केल्या आहेत. त्याने लिहिले की, “हे अनेक भावनांचे मिश्रण आहे. सगळे नवीन आहे,पण ओळखीचे वाटते. म्हणजे ते मला आधी जाणवले नाही असे नाही. तर ते मला माझ्या रक्तातच असल्यासारखे सर्वात मौल्यवान आणि सुंदर स्वप्नात जाणवले. एक भावना इतकी खोल आहे की मी व्यक्त करू शकत नाही, कारण मला भीती वाटते की माझा आनंद फटाक्यांसारखा फुटेल.

करणने पुढे लिहिले की, “जेव्हा आम्हाला कळले की आम्ही आईबाबा होणार असून आम्हाला एक लहान बाळ होणार आहे. आमची एक छोटी आवृत्ती, एक लहान बाळ, तेव्हा मी वेडा झालो. ही भावना इतकी गोड आणि मोठी असेल असं कधीच वाटलं नव्हतं. मला माहित नव्हते की ही भावना इतकी तीव्र असेल.

हे असे काहीतरी होते जे मला पूर्णपणे समजू शकत नव्हते आणि ज्यावर मी नियंत्रण ठेवू शकत नव्हतो. यावेळी एक स्त्री तिच्या आत घडणाऱ्या चमत्कारासाठी अनेक भावनांमधून जाते. ही गोष्ट माझ्यासाठी प्रेम काय आहे, देव काय आहे, निर्माता काय आहे, हे दाखवणारे सर्वात योग्य स्पष्टीकरण आहे.

“मी सतत बदलत आहे. गोष्टी चांगल्या कशा करायच्या हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःला कसे चांगले बनवायचे याचा मी प्रयत्न करत आहे.  मी कृतज्ञ आहे की मी एका स्त्रीच्या या चमत्काराचा साक्षीदार आहे, तिच्यात एक जीव निर्माण होत आहे. मला जे वाटत होते ते शब्दांत व्यक्त करण्यासाठी मी खरोखर उत्सुक होतो.”

बिपाशाने करणच्या या पोस्टवर लगेचच कमेंट केली आहे आणि अनेक हृदयाचे इमोजी टाकून त्याच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. याशिवाय राजीव अडातिया, सुरभी ज्योती आणि आरती सिंह यांनीही कमेंट करताना या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.