तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राने मिळून दुबईत घे...

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राने मिळून दुबईत घेतलं आपल्या स्वप्नातलं अलिशान घर (Karan Kundrra And Tejasswi Prakash Buy A New Luxurious House In Dubai, Deets Inside)

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे कपल आपल्या नात्याबद्दल आणि आयुष्याबद्दल थोडेसे गंभीर झाले आहेत. आपले नाते पुढे नेण्यासाठी तसेच भविष्याचा विचार करुन त्यांनी मिळून अतिशय महागड्या आणि पॉश परिसरात एक अपार्टमेंट विकत घेतले आहे.

काही दिवसांपूर्वीच हे दोघे मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते, तेव्हा ते दुबईत घर खरेदी करणार आहेत याची कोणालाच कल्पना नव्हती. विमानतळावर दोघांना एकत्र पाहून ते एकत्र वेळ घालवण्यासाठी सहलीला जात आहेत असा सगळ्यांनी अंदाज बांधला होता.

परंतु काल रात्री लॉन्च इव्हेंटचा व्हिडिओ समोर आला. तेव्हा ते दोघे तिथे सहलीला नाही तर आपल्या स्वप्नातले घर खरेदी करण्यासाठी गेल्याचे सर्वांना समजले.

करणने नुकताच मुंबईत फ्लॅट घेतला होता आणि तेजस्वीनेही गोव्यात घर घेतले होते.

तेजस्वी आणि करण यांनी दुबईत खरेदी केलेल्या वन बीएचके फ्लॅटची किंमत कोटींमध्ये आहे. या घरात एक इनडोअर पूल देखील आहे. हे घर दुबईतील पॉश एरिया, पाम जुमेरा बीच रेसिडेन्समध्ये आहे.

बिग बॉस 15 पासून या दोघांच्या नात्याला सुरुवात झाली होती. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर तेजस्वीला खूप लोकप्रियता मिळाली. तेजस्वी सध्या एकता कपूरच्या नागिनमध्ये दिसत आहे, याशिवाय तिने मन कस्तुरी रे या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनय बेर्डेने प्रमुख भूमिका साकारली होती.