तेजस्वी प्रकाशच्या आधी या अभिनेत्रींसोबत जोडले ...

तेजस्वी प्रकाशच्या आधी या अभिनेत्रींसोबत जोडले होते करण कुंद्राचे नाव (Karan Kundra’s name has been associated with these Actresses before Tejasswi Prakash, you will be surprised to know the list)

टीव्हीवरील हॉट आणि प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक करण कुंद्रा 38 वर्षांचा झाला आहे. करणने ‘कितनी मोहब्बत है’ ते ‘बिग बॉस 15’ या शोमधून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. करण कुंद्रा आपल्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत असतो. तो सध्या टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे, पण तिच्या आधीही करणचे नाव अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहोत.

तेजस्वी प्रकाश

सध्या करण कुंद्रा टीव्हीवरील ‘नागिन’ आणि ‘बिग बॉस 15’ ची विजेती तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत फिरताना दिसतात. बिग बॉसच्या घरात दोघांची भेट झाली होती. चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडते.

मधुरा नायक

करणच्या अफेअर्सबद्दल बोलायचे झाले तर या यादीत पहिले नाव येते अभिनेत्री मधुरा नायकचे. मधुरासोबतच्या नात्यामुळे करण चर्चेत होता. असे म्हटले जाते की दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

कृतिका कामरा

करण कुंद्राचे नाव टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरासोबतही जोडले गेले होते. दोघांनी ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेत एकत्र काम केले. त्यावेळीच दोघेही प्रेमात पडले आणि एकमेकांना डेट करू लागले. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती, मात्र काही वर्षे डेट केल्यानंतर ते वेगळे झाले.

अनुषा दांडेकर

करण कुंद्रा आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर यांचे प्रेम प्रकरण अनेक वर्ष चर्चेत होते. दोघांनी जवळपास 3 वर्षे एकमेकांना डेट केले, पण नंतर दोघेही वेगळे झाले. अनुषाने करणवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता, पण करणने या प्रकरणावर मौन बाळगणे योग्य मानले.

स्वाती वत्स

करण कुंद्राचे नाव मुंबईची प्रसिद्ध मॉडेल स्वाती वत्स हिच्यासोबतही जोडले गेले आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले होते. मात्र, याबाबत अभिनेत्याला विचारले असता त्याने स्वातीला आपली मैत्रीण म्हटले.