तेजस्वी प्रकाशच्या आधी करण कुंद्राची ४ तरुणींशी...

तेजस्वी प्रकाशच्या आधी करण कुंद्राची ४ तरुणींशी इश्कबाजी ( Karan Kundra Has Dated These 4 Beauties Before Tejashwi Prakash)

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता करण कुंद्रा त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. सध्या तर तो अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसोबतच्या नात्यामुळे सतत चर्चेत आहे. आता या दोघांच्या लग्नाचीही चर्चा रंगली आहे. दोघेही आपल्या नात्याबद्दल खूप गंभीर आहेत आणि लवकरच लग्न देखील करणार आहेत असे म्हटले जाते. आज आम्ही करण कुंद्राच्या काही एक्स गर्लफ्रेंड बद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याशी त्याचे नाते फार काळ टिकले नाही.

चला जाणून घेऊया त्या चार जणींबद्दल ज्यांनी तेजस्वीच्या आधी करणच्या मनावर राज्य केले होते. 2009 पासून करण कुंद्राने आपल्या करीअरची सुरुवात केली होती. सध्या तो टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 15’मुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातच त्याच्यात आणि तेजस्वीमध्ये जवळीक निर्माण झाली होती. तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही दोघे नेहमीच एकत्र दिसतात. पण तेजस्वी आधी करण कुंद्रा अनुषा दांडेकरला डेट करत होता.

तो अनुषासोबत अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. गेल्या वर्षीच करण आणि अनुषा दांडेकर यांचे ब्रेकअप झाले होते. अनुषाने करण कुंद्रावर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. करणने अद्याप अनुषासोबतचे आपले फोटो सोशल मीडियावरून काढलेले नाहीत. त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे. अनेकांच्या मनात त्याच्या आणि अनुषाच्या नात्याबद्दल अजुनही प्रश्न आहेत.

पण अनुषासोबतच्या फोटोंवर करणने स्पष्टीकरण देत म्हटले की, माझे आयुष्य हे सोशल मीडियावर नाही, माझे आयुष्य ते आहे जिथे मी राहतो, जिथे काम करतो. त्यामुळे तिथून गोष्टी डिलीट होणे महत्त्वाचे आहे.

करणने अजुनही त्याच्या आणि अनुषाच्या ब्रेकअप बद्दल स्पष्टीकरण दिले नसले तरीही अनुषाने मात्र करणवर धोका दिल्याचा आरोप लावला होता. पण काहीही असो आता मात्र करणच्या आयुष्यात तेजस्वी आहे. अनुषा दांडेकरच्या आधी २०१२ मध्ये करण मधुरा नाईकला डेट करत होता. मात्र तिच्यासोबत करणचे नाते फार काळ टिकले नाही. त्यांचा काही दिवसांतच ब्रेकअप झाला होता.

तसेच करणने जेव्हा आपल्या करीअरची सुरुवात केली होती तेव्हा तो आपली सहकलाकार कृतिका कामराला डेट करत होता. प्रेक्षकांना त्यांची ऑनस्क्रीन जोडी खूप आवडायची. कृतिका कामराआधी योगिता बिहानीनेही करणच्या मनावर राज्य केले आहे.

योगिता बिहानी ‘दिल ही तो है’ या मालिकेत करणची सहकलाकार होती. पण योगिताने ही बातमी चुकीची असल्याचे सांगत या केवळ अफवा असल्याचे म्हटले.भूतकाळ काहीही असला तरी करण आता तेजस्वी सोबत खूप खुश दिसतो. त्यांचे चाहते सुध्दा त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत.