करण कुंद्राचे ट्विट पाहून लोकांना त्याचा तेजस्व...
करण कुंद्राचे ट्विट पाहून लोकांना त्याचा तेजस्वीसोबत ब्रेकअप झाल्याचा दाट संशय, चाहत्यांनी अभिनेत्याला घेतले फैलावर (Karan Kundra Gets Brutally Trolled For His Cryptic Post, Actor’s Tweet Sparks Breakup Rumours With Tejasswi Prakash, Fans React)

सध्या टीव्हीवरील सर्वात लाडके जोडपे म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडते. या दोघांनीही यापूर्वी दुबईमध्ये एकत्र मिळून मालमत्ता खरेदी केली होती. त्यानंतर दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. पण याच दरम्यान करणच्या एका विचित्र ट्विटने चाहत्यांना अस्वस्थ केले आहे. त्याच्या त्या ट्विटमुळे या दोघांचे ब्रेकअप झाल्याचा संशय लोकांना आला आहे. या ट्विटसाठी लोकांनी करणला खूप ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

करणने ट्विटमध्ये एक कविता लिहिली आहे – न तेरी शान कम होती, न रुत्बा घटा होता, जो घमंड में कहा, वही हंस कर कहा होता… … यानंतर लोकांच्या कमेंट्स येऊ लागल्या आणि लोकांना वाटले की करण आणि तेजस्वी यांच्यात काहीतरी बिनसले आहे.
na teri shaan kam hoti..
— Karan Kundrra (@kkundrra) March 7, 2023
na rutba ghata hota..
jo ghamand mein kaha..
wahi hass ke kaha hota…
एका युजरने लिहिले – तो सरळमार्गी आहे. शुगर कोटिंग करून बोलणे त्याला आवडत नाही. एका चाहत्याने दुःख व्यक्त करत सांगितले की करण माझ्या वडिलांचे काल निधन झाले आणि मला झोप येत नाही, परंतु मी तुझ्याकडून आणि तेजूकडून शिकलो आहे की जीवनातील प्रत्येक आव्हानाला ताकदीने कसे तोंड द्यावे. जेव्हा तुमचे प्रियजन तुम्हाला सोडून जातात तेव्हा काहीही शिल्लक राहत नाही. त्यामुळे तुमच्या प्रियजनांना तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका आणि त्यांच्यासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.

दुसर्या युजरने लिहिले की, जर हे लक्ष वेधण्यासाठी नसेल तर ते काय आहे? सोशल मीडियावर आपल्या गर्लफ्रेंडबद्दल असे कोण बोलतं, या गोष्टी फोनवर वैयक्तिकरित्या हाताळल्या जाऊ शकतात. युजर्स करणची तुलना दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद यांच्या प्रेम आणि ब्रेकअप स्टोरीसोबत करत आहेत, कोणी म्हणत आहे की तेजस्वीने जे सांगितले ते बरोबर नव्हते, तर करणची पद्धतही चुकीची आहे. एकाने सांगितले की, मला हा माणूस आवडत नाही. इतरांनी लिहिले की प्रत्येक पुरुष स्वतंत्र आणि मजबूत स्त्रीला हाताळू शकत नाही.

मात्र, दोघांमध्ये सर्व काही सुरळीत व्हावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. एका युजरने या कपलला सल्ला देत म्हटले की, अभिमान किंवा इतर काहीही हरले तरी शेवटी फक्त प्रेम जिंकते आणि तेच जीवनात उरते, त्यामुळे डोके थंड ठेवा. विचार करा.
या दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तेजस्वी नागिन या मालिकेत दिसत आहे, तर करण तेरे इश्क में घायालमध्ये लांडग्याच्या रूपात लोकांचे मनोरंजन करत आहे.