करण जोहरच्या ग्रँड बर्थडे पार्टीला संपूर्ण बॉलि...

करण जोहरच्या ग्रँड बर्थडे पार्टीला संपूर्ण बॉलिवूडची हजेरी, गर्लफ्रेंड सबा सोबत ऋतिक रोशन, दबंग खान, विक्की-कॅट दिसले अनोख्या अंदाजात … (Karan Johar’s Grand Star-Studded Birthday Bash: Celebs Arrive In Style For kJ’s 50th Birthday Party)

फिल्म निर्माता करण जोहर (Karan Johar) ने काल २५ मे ला आपला ५० वा वाढदिवस एकदम धुमधडाक्यात साजरा केला. त्यानिमित्त आयोजित ग्रँड पार्टीसाठी बहुतकरून संपूर्ण बॉलिवूडने हजेरी लावली होती. सेलिब्रेटींच्या उपस्थितीत सजलेल्या या पार्टीतील सर्व फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत. ही स्टार मंडळी एकापेक्षा एक सरस अशा परिधानात अवतरली होती.

बर्थडे बॉय करण जोहर ग्रीन शिमरी ब्लेजरमध्ये चमकत होता. धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता देखील बर्थडे पार्टीत सहभागी झाले. टाइगर श्रॉफ, मनीष मल्होत्रा आणि शनाया कपूर यांनी पार्टीत जान आणली. बॉइज ब्लॅक सूट मध्ये होते तर शनाया कपूरने थाई हाई स्लिट ब्लॅक सेक्सी गाउन घालून महफिल लूटली. ती अतिशय स्टायलिश दिसली. धर्मा प्रोडक्शनच्या बेधडक चित्रपटातील शनाया व्यतिरिक्त गुरफतेह पीरजादा आणि लक्ष्य हे कलाकारही पार्टीमध्ये दिसले.

करणने आपल्या बर्थडे दिवशी नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. आता तो रोमँटिक नव्हे तर अॅक्शन चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.

श्वेता बच्चन पार्टीत ब्राइट रेड गाउन आली होती. तर आमिर खान आपली माजी पत्नी किरण राव सोबत आला. विक्की कौशल आणि कतरीनाची एंट्रीही ग्रँड होती.

सारा अली खान भाऊ इब्राहिम सोबत आली अन्‌ सैफ करीनासोबत.

रश्मिक मंदाना ते आयुष शर्मा, अर्पिता, प्रीति झिंटा, रवीना टंडन, रणबीर कपूर, नीतू कपूर यांसारख्या बड्या स्टार्सनी पार्टीची शान वाढवली.

मलायका अरोरा तिच्या नेहमीच्या खास स्टाइलमध्ये दिसली तर दबंग खानने देखील त्यांच्या अंदाजात एन्ट्री मारली. लव्ह बर्ड्‌स ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांनी हातात हात घालून पार्टीत प्रवेश करताच सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. ऐश्वर्या राय आणि अभिषेकही पार्टीत आले होते तर अनुष्का शर्मा देखील सेक्सी गाऊनमध्ये दिसली. ब्लॅक कलरच्या तिच्या गाऊनने सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळवल्या.

कियारा आडवाणी आणि परिणीती चो्प्रा या सौंदर्यवती नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होत्या. मिसेस नेने अर्थात माधुरी दीक्षितही आपल्या पतीसोबत पार्टीला आली होती.  याशिवाय पार्टीमध्ये मीरा कपूर-शाहिद, रणवीर सिंह, रकुलप्रीत आणि दिव्या कुमार, वरुण धवन देखील आले.

जाह्नवी कपूर, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे इत्यादी जवळजवळ सर्वच बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी या पार्टीमध्ये दिसली.

शानदार पार्टीतील कलाकारांचे हे काही फोटोज पाहूया –