करण जोहर पडला होता प्रेमात , स्वत: केला खुलासा ...

करण जोहर पडला होता प्रेमात , स्वत: केला खुलासा (Karan Johar Was In Love With Someone, He Himself Said)

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या तो प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’च्या 7व्या सीझनमुळे चर्चेत आहे. करणचा हा शो लोकांना खूप आवडतो. या शोमध्ये इंडस्ट्रीतील अनेक मोठे सुपरस्टार करणसोबत कॉफी प्यायला येतात आणि आपल्या आयुष्यातील अनेक गुपिते सांगतात. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे हा शो खूप लोकप्रिय झाला आहे. अनेकदा कलाकारांकडून त्यांची गुपिते काढून घेणाऱ्या करणने स्वत:च आपले एक गुपित शोमध्ये सांगितले. ते जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

‘कॉफी विथ करण’च्या 7 व्या सीझनमध्ये आतापर्यंत अनेक कलाकार येऊन गेले आहेत. करण या शोमध्ये अधिकतर कलाकारांचे नातेसंबंध, वैवाहिक जीवन आणि ब्रेकअप यासारख्या गोष्टींवर चर्चा करतो, परंतु यावेळी काहीतरी भलतेच घडले. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये वरुण धवन आणि अनिल कपूर आले होते. त्यावेळी त्यांनी स्वतःबद्दल सांगत असतानाच करणला बोलण्यात गुंतवून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली. वरुणने करणला त्याच्याच प्रश्नांमध्ये अशा प्रकारे अडकवले की, इच्छा नसतानाही करणने आपल्या प्रेमाबद्दल खुलासा केला. करणने नॅशनल टीव्हीवर आपल्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. करणने आपल्या नात्याबद्दल अशाप्रकारे उघडपणे बोलण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.

 ‘कॉफी विथ करण 7’मध्ये अनिल कपूर आणि वरुण धवन पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा त्यांनी खूप गप्पा मारल्या. धोका या विषयावर त्यांच्या गप्पा चालू होत्या यादरम्यान वरुण धवनने करण जोहरला विचारले की तू रिलेशनशिपमध्ये कोणाची फसवणूक केली आहे का किंवा तुला कोणी फसवले आहे का? वरुणच्या या प्रश्नाला उत्तर देताना करण जोहर म्हणाला की, मी रिलेशनशिपमध्ये कधीच कोणाची फसवणूक केली नाही. करणच्या या उत्तरावर वरुणने लगेच म्हटले की, “याचा अर्थ तू नॅशनल टीव्हीवर म्हणत आहेस की तू रिलेशनशिपमध्ये आहेस.”

वरुणचे बोलणे ऐकून करण जोहर लगेच म्हणतो, “मी रिलेशनशिपमध्ये नाही. माझे ब्रेकअप झाले आहे हे तुला पण माहीत आहे.” इतकेच नाही तर ब्रेकअपच्या वेळी वरुण धवनने त्याला खूप साथ दिल्याचे करणने सांगितले. यासाठी करणने शोमध्ये वरुणचे आभारही मानले. मात्र, तो कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, याचा खुलासा करणने केला नाही.