करण जोहरला आपल्या बायोपिकमध्ये घ्यायचंय या अभिन...

करण जोहरला आपल्या बायोपिकमध्ये घ्यायचंय या अभिनेत्याला, निर्मात्याने सांगितले नाव (Karan Johar Wants To Take This Superstar In His Biopic, Filmmaker Told The Name Of The Actor)

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त इतर गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो. इंडस्ट्रीत नेहमीच स्टारकिड्सना सर्वप्रथम प्राधान्य देण्याचा आरोप करणवर केला जातो. एवढेच नाही तर स्टार्सच्या मॅचमेकिंगसाठी त्याला ट्रोलर्स इंडस्ट्रीतील सीमा आंटी असे म्हणतात. सध्या बायोपिकचा जमाना आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांचे आयुष्य आपल्याला चित्रपटाच्या रुपात पाहायला मिळते. अशातच जर करण जोहरचा बायोपिक झाला तर त्यात करणची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न करणलाच विचारला गेला.


एका लाइव्ह शोदरम्यान करण जोहरला विचारण्यात आले होते की, तुला तुझ्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्याला कास्ट करायचे आहे, कोण तुझी भूमिका योग्य प्रकारे करू शकतो, यावर करण जोहरने क्षणाचाही विलंब न लावता सुपरस्टार रणवीर सिंहचे नाव घेतले.

या प्रश्नाचे उत्तर देताना करण जोहर म्हणाला, “मला वाटते की तो रणवीर सिंह आहे कारण तो सतत रंग बदलत असतो.” रणवीरचा फॅशन सेन्स किती लोकप्रिय आहे याची सर्वांनाच कल्पना आहे. त्याचा विचित्र फॅशन सेन्स चर्चेत असतो. करण जोहरची अवस्थाही काहीशी तशीच आहे. तो त्याच्या विचित्र फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे. ऑफ कलरच्या कपड्यांमुळे तो अनेकदा ट्रोल होत असतो.


मात्र, करण जोहरच्या आयुष्यावर बायोपिक बनणार की नाही याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही. पण त्याची कारकीर्द फारच रंजक असल्यामुळे त्याच्यावर बायोपिक नक्कीच बनवता येईल. करणच्या सुपरहिट चित्रपटांबद्दल सांगायचे झाल्यास ‘माय नेम इज खान’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर’ सारखे शानदार चित्रपट त्याने बनवले आहेत.


करण जोहरचे चित्रपट त्याच्या नेत्रदीपक सेटसाठीही प्रसिद्ध आहेत. सध्या तो आपल्या आगामी ‘रॉकी और रानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम