करण जोहरने स्वत:ला दोषी ठरवत सांगितले बॉलिवूड च...

करण जोहरने स्वत:ला दोषी ठरवत सांगितले बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण (Karan Johar Tells Why Bollywood Films Are Flopping, Blamed Himself Too)

कोविड संपल्यानंतर 2022 मध्ये ज्या प्रकारे बॉलिवूड चित्रपट फ्लॉप झाले त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. याउलट साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई करत आहेत. अशा परिस्थितीत आता प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट फ्लॉप होण्यामागची काही कारणे सांगून करणने यासाठी स्वतःला जबाबदार धरले आहे.

 नुकताच करण जोहर गलाट्टा प्लसच्या राउंड टेबल संभाषणात सहभागी झाला होता. या संवादादरम्यान करण म्हणाला, “मला वाटते की, आपण हिंदी मेनस्ट्रीम इंडस्ट्रीमधून आलो आहोत ही सर्वात मोठी समस्या आहे. आणि मी यात स्वतःला सामील करतो, बाकीच्या सिनेमा आणि पॅनेलमध्ये दर्जा तितका चांगला नाही. जे नेहमी चालते त्यावरच आपण नेहमी चालायला लागतो. आमच्याकडे ७० च्या दशकात सलीम-जावेद होते, जे मूळचे इथलेच होते. त्यावेळी आम्ही अनेक भक्कम कामे पाहिली.

करण पुढे म्हणाला, “यानंतर 80 च्या दशकात काहीतरी घडले आणि अनेक रिमेक सुरू झाले. तेव्हापासून विश्वास कमी होऊ लागला. आम्ही प्रत्येक चांगल्या तमिळ-तेलुगू चित्रपटाचा रिमेक करू लागलो. 90 च्या दशकात ‘हम आपके है कौन’ ही प्रेमकथा हिट झाली तेव्हा माझ्यासह सर्वजण एकाच शर्यतीत अडकले. प्रेमाच्या ट्रॅकमुळे शाहरुख खान नावारुपास आला. यानंतर 2001 मध्ये लगान ऑस्करला गेला, तेव्हा सर्वांनी तसे चित्रपट बनवायला सुरुवात केली.

इतकेच नाही तर करण जोहर पुढे म्हणाला की, “दबंगने २०१० मध्ये चांगले काम केले होते, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा व्यावसायिक चित्रपटांची रांग लावली. ही समस्या आहे, इथे आपण पराभूत होतो आणि मी इतरांपेक्षा स्वतःसाठी यावर विश्वास ठेवतो. आपल्या चित्रपटांमध्ये विश्वास आणि दृढनिश्चयाचा अभाव आहे. ही गोष्ट इतर सिनेमांकडून शिकायला हवी.

करण जोहरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सुमारे 7 वर्षानंतर त्याचा दिग्दर्शक म्हणून 2023 मध्ये ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याशिवाय शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2023 च्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे.