आलिया आई होणार असल्याचे समजताच करण जोहरच्या भाव...

आलिया आई होणार असल्याचे समजताच करण जोहरच्या भावना झाल्या अनावर (Karan Johar says he broke into tears as Alia Bhatt disclosed she was pregnant, Says- It was a very emotional moment for me)

करण जोहरचे आलिया आणि रणबीर सोबतचे नाते किती घट्ट आहे हे सगळेच जण जाणतात. करणने अनेकदा आपण आलियाला मुलगी मानत असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच आलियाने ती गरोदर असल्याची गोड बातमी सोशल मीडियावरुन सगळ्यांना दिली. आलिया आई होणार असल्याचे कळताच करणला काय वाटले ते त्याने सांगितले. करण म्हणाला की, जेव्हा मला आलिया आई होणार असल्याचे समजलं तेव्हा माझे डोळे पाण्याने भरुन आले.  मी एकदा ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा आलिया तिथे आली आणि तिने मला तिच्या गरोदरपणा बद्दल सांगितलं. ती बातमी ऐकून मी माझ्या डोळ्यातलं पाणी थांबवू शकलो नाही. तो माझ्यासाठी खूप भावनिक आणि खास क्षण होता.

करणने पुढे सांगितले की , आलियाची गोड बातमी ऐकताच मी तिला म्हणालो की , मला विश्वासच बसत नाही की तू आई होणार आहेस. हे असं झालं की आता माझ्या बाळाला बाळ होणार आहे. तो माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता आणि अजूनही आहे. मी माझ्या पालकत्वाची सुरुवात आलियापासूनच केली होती. ती 17 वर्षांची असताना माझ्या ऑफिसमध्ये आली होती. मी तिला एका लहान मुलीपासून ते एक उत्तम कलाकार होताना पाहिले आहे. आता ती 29 वर्षांची आहे. गेली 12 वर्षे आमच्यासाठी खूप भारी होती. आमच्यात एक घट्ट नाते आहे. माझ्या मोठ्या लेकीच्या बाळाला कुशीत घेणे हा माझ्यासाठी खूप अनमोल क्षण असेल. मी त्याला कुशीत घेण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

आलियाने जेव्हा ही गोड बातमी सोशल मीडियावर सांगितली तेव्हा करणने सुद्धा आनंद व्यक्त करत रणबीर आलियाचा फोटो शेअर केला होता. आणि त्यावर माझं बाळ आता आई होणार आहे. मी माझ्या भावना शब्दात मांडू शकत नाही पण मी खूप खुश आहे. दोघांनाही खूप प्रेम असे कॅप्शन दिले होते.

आलिया करणला तिच्या वडिलांप्रमाणेच मानते. तिच्या करीअरच्या बाबतीतल्या अनेक निर्णयात ती करणचे मत विचारात घेते. लवकरच करणचा कॉफी विथ करण 7  हा शो सुरु होणार असून त्यात आलिया आणि रणवीर येणार आहेत.