सिद्धार्थच्या आठवणीने करण जौहर झाला भावुक, श्रद...
सिद्धार्थच्या आठवणीने करण जौहर झाला भावुक, श्रद्धांजली देताना म्हणाला, मी श्वास घेऊ शकत नाही (Karan Johar pays emotional tribute to Sidharth Shukla, says I can’t even breathe)

बिग बॉस विजेता आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा सेलिब्रिटी आणि लाखो लोकांचा आवडता होताच शिवाय तो बिग बॉसचा देखील फेवरेट होता. याच कारणास्तव बिग बॉस ओटीटीच्या विशेष पर्वात सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आणि शोचा होस्ट करण जोहरने अभिनेत्याला त्याच्या स्वतःच्या शैलीत श्रद्धांजली दिली आणि या दरम्यान तो खूप भावूकही झाला.

वास्तविक, ‘बिग बॉस ओटीटी’च्या’ संडे का वार ‘विशेष पर्वाची सुरुवात सिद्धार्थ शुक्लाच्या एका व्हिडिओने झाली, ज्यात सिद्धार्थचा ‘बिग बॉस 13’ मधील प्रवास दाखवण्यात आला. व्हिडिओ पाहून प्रत्येकाचे डोळे सिद्धार्थच्या आठवणीने पाणावले. होस्ट करण जोहर देखील सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीने भावुक झाला.

सिद्धार्थचा व्हिडिओ संपल्यानंतर, करण जोहर पडद्यावर आला आणि सिद्धार्थची आठवण करून म्हणाला, “सिद्धार्थ शुक्ला, असा चेहरा, एक नाव जे आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. बिग बॉस कुटुंबातील एक आवडता सदस्य .. जो फक्त माझा मित्र नव्हता तर चित्रपटसृष्टीतील असंख्य लोकांचा मित्र होता, तो अचानक आपल्या सर्वांना सोडून गेला. आमच्यापैकी कोणीही आतापर्यंत यावर विश्वास ठेवू शकत नाही.” सिद्धार्थची आठवण करून करण पुढे म्हणाला, ‘मी सुन्न झालो आहे. मला श्वास घेता येत नाही. माझा अजूनही विश्वास बसत नाही. सिड एक चांगला मुलगा होता. एक अद्भूत मित्र होता. तो असा माणूस होता की, ज्याच्या आजूबाजूला राहणे छान वाटायचे. सकारात्मकता आणि हास्याने त्याने लाखो लोकांची मने जिंकली. सिद्धार्थ शुक्ला किती लोकप्रिय होता याचा पुरावा त्याचे करोडो चाहते आहेत. लोकांचे त्याच्यावर अमाप प्रेम होते. सिद्धार्थ शुक्ला यांना श्रद्धांजली. सिद्धार्थ शुक्ला तुझी खूप आठवण येईल. आम्हाला तुझी खूप आठवण येईल. या वेळी शो सुरू राहण्यासाठी तुम्हाला आणि मला खूप सामर्थ्याची आवश्यकता आहे.”

काही आठवड्यांपूर्वी सिद्धार्थ शुक्ला शहनाज गिलसोबत ‘संडे का वार’ मध्येही दिसला होता आणि त्याने करण जोहरसोबत खूप मजा केली होती. करण जोहरने सिद्धार्थ शुक्लासोबत ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटातही काम केले होते आणि त्याच्याबद्दल बोलताना तो खूप भावूक दिसत होता. परंतु सोशल मीडियावर लोक मात्र करणचे अश्रू बनावट आहेत असं म्हणत त्याला ट्रोल करत आहेत. ही वेगळी गोष्ट आहे. लोक म्हणतात की करण जोहरचे अश्रू पाहून त्यांना राग येत आहे. सोशल मीडियावर, नेटकरी पुन्हा एकदा करण जोहरची जोरदार टीका करत आहेत.

सिद्धार्थ शुक्ला यांचे 2 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांचे कुटुंबच नाही तर टीव्ही इंडस्ट्रीचे लोक आणि चाहते अजूनही शॉकमध्ये आहेत आणि सतत त्यांच्या आवडत्या अभिनेत्याची आठवण काढत आहेत.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम