करण जोहरने उर्फी जावेदची अशी खिल्ली उडविली, की ...

करण जोहरने उर्फी जावेदची अशी खिल्ली उडविली, की ती नक्कीच त्याचा राग राग करेल (Karan Johar Made Fun Of Urfi Javed, Knowing That The Actress Will Be Furious With Anger)

करण जोहर काही ना काही निमित्ताने चर्चेत असतो. आता ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचा नवीन सीझन सुरू झाल्याने स्वारी पुन्हा चर्चेत आली आहे. या कार्यक्रमात करणने उर्फी जावेद बद्दल असं एक सूचक विधान केलं आहे की त्यामुळे तो पुन्हा व्हायरल झाला आहे.

अलिकडेच त्याच्या या कार्यक्रमात सोनम कपूर व अर्जुन कपूर पाहुणे म्हणून आले होते. त्यात आपल्या अभिनेत्रींच्या फॅशन सेन्सवर करण घसरला. अन्‌ त्याने उर्फी जावेदची खिल्ली उडविली.

सोनमशी बातचीत करताना करणने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाऊन प्रसिद्धी मिळविणाऱ्या कलाकारांची माहिती काढली.

त्यावर सोनमने गोंधळात टाकणारे उत्तर दिले. तो धागा पकडून करण जोहरने उर्फी जावेदला लक्ष्य केले. तो म्हणाला, “आपल्याकडे असे काही लोक आहेत, जे सजून धजून विमानतळावर जातात. मिडियाशी बोलतात. पण फ्लाइट न पकडता परत येतात.”

लक्षात घ्या की, असे प्रश्न उर्फी जावेदला लोकांनी कैक वेळा विचारले आहेत. ‘तू तयार होऊन एअरपोर्टला कां बरं जातेस?’ किंवा ‘एअरपोर्टच्या बाहेर फोटो का काढून घेतेस?’ असे प्रश्न तिला ट्रोलर्सने पूर्वी विचारले आहेत. त्यांच्या उत्तरादाखल उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला होता. “मी हिंडेन, फिरेन, नाचेन, गाईन, हसेन, रडेन, खेळेन, बाहेर जाईन, एकटी जाईन नाहीतर आणखी कोणाबरोबर जाईन…… तुम्हाला काय पडली आहे?”