‘केस तो बनता है’ मध्ये करण जोहर आरो...

‘केस तो बनता है’ मध्ये करण जोहर आरोपीच्या पिंजऱ्यात ( karan johar is grilled in comedy court room drama)

‘केस तो बनता है’ हा कॉमेडी शो दर आठवड्याला लोकांचे मनोरंजन करत आहे. अॅमेझॉन मिनी टीव्हीच्या या मजेदार कोर्टरूम ड्रामाच्या उद्याच्या भागात निर्माता दिग्दर्शक करण जोहरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्याला विनोदी अभिनेता परितोष त्रिपाठी उभेआडवे प्रश्न विचारुन भंडावून सोडणार आहे.

करण जोहर हा सुप्रसिद्ध निर्माते यश जोहर आणि हिरु जोहर यांचा सुपुत्र आहे. त्या संदर्भात करणची फिरकी घेताना परितोष बोलला की, ‘ स्टार किड जब पैदा होता है, तो पैदा होतेही सबसे पहिले मां नही, धर्मा बोलता है.’ यावर उपस्थितांमध्ये खसखस पिकली. कारण यश जोहर यांच्या निर्मातीसंस्थेचं नाव धर्मा प्रॉडक्शन आहे. जी आता करण चालवित आहे.

असे अनेक अतरंगी प्रश्न करणला परितोषने विचारुन कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे. या विनोदी शोमध्ये वरुण शर्मा सरकारी वकिल तर रितेश देशमुख बचाव पक्षाचा वकिल झाला आहे. कुशा कपिला न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे.