वयाच्या पन्नाशीत करण जोहरला होतोय् लग्न न केल्य...

वयाच्या पन्नाशीत करण जोहरला होतोय् लग्न न केल्याचा पश्चाताप : आपल्या खासगी जीवनातील गुपित त्याने उघड केले. (Karan Johar deeply regrets being single, Filmmaker makes shocking revelations about his personal life)

बॉलिवूडमध्ये उत्तम फिल्ममेकर, दिग्दर्शक, स्क्रीनरायटर, आणि होस्ट म्हणून करण जोहरचे नाव प्रथम स्थानी आहे. चित्रपट करण जोहरचा असेल तर यशस्वी होईल याची शाश्वती असते. त्याने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. करणने नुकताच त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

करणच्या चित्रपटापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना जास्त असते. काही दिवसांपूर्वीच करणने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. त्यात त्याने वयाच्या ५० व्या वर्षी त्याला कोणत्या गोष्टींचा पश्चाताप होत आहे त्याची माहिती दिली.

पहिला खुलासा

 काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत करणने सांगितले की, मी माझ्या आयुष्याचा जोडीदार शोधायला खूप उशीर केला. कुठल्या तरी हिल स्टेशनवर फिरायला जाणे तिथे आपल्या जीवनसाथीचा हात हातात घेऊन चालणे….. आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या आपले पालक किंवा मुलं करु शकत नाही. त्या करण्यासाठी आपल्या जोडीदाराचीच गरज असते.

दुसरा खुलासा-

२०१५ मध्ये करण सरोगसी द्वारे यश आणि रुही या जुळ्या मुलांचा पिता बनला. करणच्या मते त्याने हा निर्णय देखील खूप उशीरा घेतला. पण मी एक पालक म्हणून स्वत: खूप परिपूर्ण आणि सुखी आहे. माझ्या या निर्णयासाठी मी देवाचे आभार मानतो. पण मला असे वाटते की मी हा निर्णय ५ वर्षे आधीच घेतला असता तर आणखी बरे झाले असते असे करणने सांगितले.

तिसरा खुलासा

फिल्म प्रॉडक्शन, स्टुडिओ बिल्डिंग यांसारख्या कामांमुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्याकडे जास्त लक्ष देऊ शकलो नाही असे करणने सांगितले. त्यावेळी मी माझ्या वैयक्तिक आयुष्याकडे फारसे लक्ष दिले नाही याचा मला आता पश्चाताप होत आहे. कामाच्या नादात मी माझे वैयक्तिक आय़ुष्य कुठेतरी मागे टाकले अशी खंत करण जोहरने व्यक्त केली.

चौथा खुलासा

करण म्हणाला की त्याने त्याच्या आयुष्यातल्या अशा गोष्टीला महत्त्व दिले नाही जे त्यावेळी देणे गरजेचे होते. पण आता वेळ हातातून निसटली आहे.

पाचवा खुलासा

आपल्या आयुष्यात एक अशी जागा असते जी फक्त आपल्या जोडीदाराची असते. माझी ती जागा रिकामीच राहिली. लाइफ पार्टनर, नाते, रोमान्स या कोणत्याच गोष्टी माझ्याकडे नाही. माझ्या आयुष्यात ती पोकळी कायम राहील याची मला खूप खंत आहे.

करणच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’या चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह, शबाना आज़मी, धर्मेंद्र आणि जया बच्चन अशी स्टार कास्ट असेल. याशिवाय त्याने कॉफी विथ कऱण 7 या शो चे शूटिंगसुद्धा सुरु केले आहे.