शाहरुख, करण जोहर आणि अक्षयबाबतीत केआरेकचा बदलला...

शाहरुख, करण जोहर आणि अक्षयबाबतीत केआरेकचा बदलला सूर (Karan Johar-Akhay Kumar And Shah Rukh have nothing to do with my arrest, KRK’s tweet sparks rumour)

अभिनेता, चित्रपट निर्माता आणि स्वत:ला सर्वात मोठा चित्रपट समीक्षक म्हणवणारा केआरके नुकताच जेलमधून बाहेर आला आहे. जेलमधून बाहेर येताच त्याने पुन्हा एकदा बदला घेण्याच्या दृष्टीने ट्विट केले होते मात्र नंतर त्याने हे ट्विट डिलीट केले. आता पुन्हा एकदा त्याने असे काही ट्विट केले जे खूप व्हायरल होत आहे.

केआरकेच्या अटकेनंतर त्याला करण जोहर, शाहरुख खान, अक्षय कुमारमुळे जेल झाल्याचे बोलले जात होते. तसेच केआरकेने चित्रपटाविरोधात बोलू नये म्हणून ब्रह्मास्त्र प्रदर्शित होण्यापूर्वीच प्लॅनिंग करून त्याला अटक करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. नेटकऱ्यांनी केआरकेला समर्थन देत तो जेलमधून बाहेर येताच ‘टायगर इज बॅक’ म्हणत ट्विटरवर त्याचे स्वागत केले. मात्र आता त्याच केआरकेची भाषा पूर्णपणे बदलली आहे.

केआरकेने काही काळापूर्वी ट्विट करत म्हटले की, माझ्या अटकेमागे करण जोहरचा हात असल्याचे बोलले जाते. पण तसे नाही, करण, शाहरुख, आमिर, अजय आणि अक्षयचा माझ्या अटकेशी काही संबंध नाही. केआरकेचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या ट्विटवर युजर्सकडून प्रतिक्रिया येत आहेत.

काही युजर्स हे षडयंत्र असल्याची कमेंट करत आहेत, काही जण तो टीआरपी स्टंट असल्याचे सांगत आहेत, तर अनेक युजर्स केआरकेने रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्रचे पुनरावलोकन करावे अशी मागणी करत आहेत.

जेलमधून बाहेर आल्यानंतर केआरकेने ट्विटरवर संताप व्यक्त करत लिहिले की, ‘मी बदला घेण्यासाठी परत आलो आहे.’ पण नंतर अचानक केआरकेचा सूर बदलला, त्याने ते ट्विट डिलीट केले आणि मीडियावर आरोप करत लिहिले की, “मीडिया नवीन गोष्टी तयार करत आहे. मी परत आलो आहे आणि माझ्या घरी सुखरूप आहे. मला कोणाचाही बदला घेण्याची गरज नाही. माझ्यासोबत घडलेल्या सर्व वाईट गोष्टी मी विसरलो. मला वाटते की ते माझ्या नशिबात लिहिले होते. ”

ऋषी कपूर, इरफान खान आणि अक्षय कुमार यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यामुळे केआरकेला 2020 मध्ये विमानतळावरून अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्यावर फिटनेस ट्रेनरचा विनयभंग केल्याचा आरोपही होता. सध्या त्याला या दोन्ही प्रकरणात जामीन मिळाला आहे.