कपूर कुटुंबात आज होणार नव्या पाहुण्याचे आगमन, र...

कपूर कुटुंबात आज होणार नव्या पाहुण्याचे आगमन, रणबीर कपूरसोबत आलिया हॉस्पिटलमध्ये (Kapoor Khandan To Welcome Baby Today, Alia Bhatt And Ranbir Kapoor Arrives At Hospital For Delivery)

आलिया भट्टने आपल्या गरोदरपणाची घोषणा केल्यापासून ती सतत चर्चेत आहे. आलियाने गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत प्रवेश केल्यापासून तिच्या प्रसूतीबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत. कपूर कुटुंब देखील बाळाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहे. चाहते आलिया आई होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलियाच्या डिलिव्हरी संबंधित मोठी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्ट प्रसूतीसाठी एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे कपूर कुटुंबाच्या घरी कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते. आलिया रणबीर कपूरसोबत सकाळी 7.30 वाजता H.N. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली असून ती कधीही आपल्या बाळाला जन्म देऊ शकते.

मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल हे तेच हॉस्पिटल आहे जिथे रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच आलियाने बाळाच्या जन्मासाठी या हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता.

काही दिवसांपूर्वी आलिया नोव्हेंबर 2022 च्या अखेरीस किंवा डिसेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यात बाळाला जन्म देऊ शकते असे म्हटले जात होते. परंतु कदाचित आलिया आजच बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे.