कपिल शर्माने कोणार्कच्या सूर्य मंदिरासमोरचे फोट...

कपिल शर्माने कोणार्कच्या सूर्य मंदिरासमोरचे फोटो टाकले, तर लोकांनी प्रश्न केले, ‘द कश्मीर फाइल्स’ पाहिलास का? (Kapil Sharma Shares Picture Of His Visit To Konark Temple : Gets Trolled For Not Promoting The Kashmir Files)

कपिल शर्मा सध्या ओरिसामध्ये आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला आहे. त्याने कोणार्कच्या सूर्य मंदिरास भेट दिली व त्या प्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर टाकले. तर लोकांनी त्याला ट्रोल  केले.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून लोकांनी त्याला प्रश्न केले आहेत. कोणी विचारलं, चित्रपट पाहिलास का? तर अन्य कोणी लिहिलं की, तुझ्या शो मध्ये स्थान दिलं नाहीस. आमीर खानने तर हा चित्रपट सगळ्यांनी पहिला पाहिजे असं सांगितलं तरी काही लोक म्हणताहेत, ‘आम्ही लाल सिंह चढढा पाहणार नाही.’

काही लोकांनी अनुपम खेरचा व्हिडीओ पोस्ट करून ‘कश्मीर फाइल्स’ च्या विक्रमी उत्पन्नाचे आकडे दिले आहेत. अन कपिलला सांगताहेत की, तू मंदिराचे फोटो टाकलेस तरी ‘बॉयकॉट कपिल शर्मा शो’ हे आमचे धोरण सुरूच राहील.

कपिल शर्माने आपल्या ओरिसा भेटीचा अनुभव चांगला असल्याने व्यक्त केले आहे. त्या आधी सूर्य मंदिर दर्शनाचा व्हिडीओ शेअर करत, एवढं प्रेम दिल्याबद्दल लोकांचे आभार मानले आहेत.