नवा सीजन नवा लूक, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प...

नवा सीजन नवा लूक, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी परत येत आहे कपिल शर्मा पण एका नव्या अंदाजात (Kapil Sharma Looks Dapper In New Look For New Season Of The Kapil Sharma Show)

‘द कपिल शर्मा शो’च्या नव्या सीझनमधून कपिल शर्मा पुनरागमन करत आहे. कपिलने नव्या सीझनमधील आपला नवा लूक दाखवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या नव्या लूकमध्ये कपिलमध्ये जबरदस्त बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.कपिलच्या या नव्या लूकचा एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कपिल रॅम्पवर चालताना दिसत आहे.यामध्ये कपिलचा बदललेला लूक आणि बदललेली स्टाइल स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कपिल बेटी फॅशन शोसाठी रॅम्प वॉक करत आहे.

स्वतः कपिल शर्माने आपला नवा लूक इन्स्टा पेजवर शेअर केला आहे,ज्यामध्ये तो खूपच स्टायलिश दिसत आहे. नवीन केशरचना, दाढीची नवीन पद्धत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपिलची फिट बॉडी खूपच प्रभावी दिसत आहे. कपिलला त्याच्या कॅज्युअल लूकमुळे आणि वाढलेल्या वजनामुळे अनेकदा ट्रोल करण्यात आले होते पण यावेळी त्याने आपल्या फिटनेसने सर्वांना आश्चर्यचकित केले. कपिलने फोटोसोबत कॅप्शनमध्ये  नवा सीझन, नवा लूक…असे लिहिले आहे.

कपिलच्या या फोटोवर हरभजन सिंगपासून ते हिना खान, सोफी चौधरी, रवी दुबे, आयुष्मान खुराना यांसारखे अनेकजण कमेंट करत आहेत. आयुष्मान खुरानाने कमेंटमध्ये व्वा ओळखता येत नाही असे लिहिले.

कपिलने शेअर केलेल्या फोटोमध्ये,काळ्या टी-शर्टसह काळी ट्राउझर घातली आहे आणि टीशर्टवर पांढरे जॅकेट घातले आहे. कपिल आपल्या नव्या लूकमध्ये फारच सुंदर आणि स्मार्ट दिसत आहे.

काहींनी कमेंटमध्ये तो एनढा तरुण कसा दिसतो.तसेच त्याने आपले वय कमी कसे केले असे विचारले आहे.

द कपिल शर्मा शोचा शेवटचा सीझन या वर्षी जूनमध्ये बंद झाला होता. निर्मात्यांनी ते लवकरच नवीन सीझन घेऊन परततील सांगितले होते.अर्चना पूरण सिंह देखील शोच्या प्रोमो शूटला दिसली. त्यासंदर्भातील एक छोटी क्लिप तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.

द कपिल शर्मा शो व्यतिरिक्त कपिल, नंदिता दास यांच्या झ्विगाटोमध्ये डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात कपिलची एक वेगळीच स्टाईल पाहायला मिळणार आहे, ज्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.