कपिल शर्माने धुमधडाक्यात साजरा केला लाडक्या लेक...

कपिल शर्माने धुमधडाक्यात साजरा केला लाडक्या लेकीचा वाढदिवस, पाहा फोटो (Kapil Sharma celebrates daughter Anayra’s 3rd birthday, See adorable pics of grand birthday celebration)

कॉमेडी किंग कपिल शर्माची मुलगी अनयरा शर्मा ३ वर्षांची झाली आहे. या खास प्रसंगी कपिलने आपल्या मुलीसाठी ग्रँड बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत त्याचे कुटंबीय आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रमंडळी आले होते. कपिल किंवा त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे कोणतेही फोटो शेअर केले नाहीत. मात्र कॉमेडियन भारती सिंगने आपल्या व्लॉगमध्ये पार्टीची झलक दाखवली. भारती आपला मुलगा गोलासोबत पार्टीला पोहोचली होती.

अनयरा शर्मासाठी आई गिन्नी चतरथने फार्म या थीमवर पार्टी आयोजित केली होती. 4 टायर केक देखील प्राण्यांच्या थीमवर आधारित होता. अनायराच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कपिलची मुलगी अमायरा खूपच क्यूट दिसत होती. तिने पांढरा आणि गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. केसांवर गुलाबी रंगाचा हेडबँड घातला होता, त्यात ती खूप गोंडस आणि निरागस दिसत होती. अनायरासोबत तिची आई गिन्नी चतरथचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गिन्नीने आपल्या मुलीसारखे मॅचिंग आउटफिट घातले आहेत.

केक कापताना कपिल आपली पत्नी गिन्नी आणि दोन्ही मुलं अनायरा आणि त्रिशानसोबत खूप आनंदी दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये कपिल आपल्या लेकीला घेऊन पाळीव कुत्र्यासोबत फोटोसाठी पोज देत आहे.

अनायराचे वेगवेगळे गोंडस फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. एका फोटोत कपिलचा धाकटा मुलगा त्रिशान देखील अनायरासोबत दिसत आहे.

भारती सिंगने आपल्या व्लॉगमध्ये या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे.व्लॉगमध्ये, तिने गिन्नी चतरथ ज्या प्रकारे आपले कुटुंब, पती, मुले, सर्व काही सांभाळते यासाठी कौतुक केले आहे.

 कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांचा विवाह 12 डिसेंबर 2018 रोजी चंदीगढमध्ये झाला. या जोडप्याला दोन मुले आहेत. मुलगी अनायराचा जन्म 10 डिसेंबरला झाला आणि मुलगा त्रिहानचा जन्म 1 फेब्रुवारी 2021 रोजी झाला होता.